Join us  

महागडे सिरम सोडा - रात्री झोपताना लावा ‘या’ २ पैकी १ तेल; चेहरा दिसेल कायम फ्रेश-चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 12:51 PM

2 Best Natural Oils for Healthy Skin : चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी २ तेलाने करा मसाज

ऋतू कोणताही असो केस आणि त्वचेला फायदेशीर ठरेल, अशा तेलाचा वापर आपण करतोच. तेलामुळे केसांना तर पोषण मिळतेच, यासह त्वचेसाठीही फायदेशीर ठरते (Skin Care Tips). बिघडलेल्या जीवनशैलीमुळे त्वचेच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमांचे डाग, काळपट पडलेली त्वचा यासह अनेक समस्या निर्माण होतात.

या समस्या सोडवण्यासाठी केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा, आपण तेलाचा वापर करून चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणू शकता (Oil for Skin). नितळ त्वचा मिळवण्यासाठी कोणत्या तेलाचा आणि कधी वापर करावा? पाहा(2 Best Natural Oils for Healthy Skin).

केसांचा होईल झाडू, वाढही खुंटेल, 'या' पाण्याने केस धुण्याची चूक अजिबात करू नका, कारण..

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा वापर आपण केसांसाठी करतोच, पण कधी त्वचेसाठी करून पाहिलं आहे का? केसांना नवीन जीवनदान देणारं हे तेल, आपल्याला त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेवर मॉइश्चरायजरसारखे काम करतात. शिवाय धूळ, माती आणि प्रदुषणामुळे खराब होणाऱ्या त्वचेतील घाण काढते. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, यासह मुरुमांचे डागही कमी होतात.

केस गळून खराटा झाले? कॉफीमध्ये मिसळा घरातलं एक खास तेल, केस इतके वाढतील की..

बदाम तेल

बदाम फक्त आरोग्यासाठी नसून, त्याचे तेल केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. बदामाचे तेल चेहऱ्यावर औषधासारखे काम करते. बदाम तेल जीवनसत्त्वे ए, बी आणि ईने समृद्ध आहे. चेहऱ्यावर रात्रीच्या वेळी बदामाचे तेल लावून मसाज केल्याने, त्वचा उजळते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर तळहातावर बदामाचे ४ ते ५ थेंब तेलाचे घेऊन चेहऱ्यावर लावून मसाज करा. हे चेहऱ्यावर अँटी-एजिंग प्रमाणे काम करते. ज्यामुळे चेहरा कायम तजेलदार दिसते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी