Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल काही केल्या कमी होत नाहीत? २ सोपे नैसर्गिक उपाय; चेहरा दिसेल फ्रेश-सुंदर

डार्क सर्कल काही केल्या कमी होत नाहीत? २ सोपे नैसर्गिक उपाय; चेहरा दिसेल फ्रेश-सुंदर

2 Easy Home Remedy for Dark Circle : मेकअपने डार्क सर्कल घालवण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन त्यावर उपाययोजना केलेल्या केव्हाही चांगल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 03:08 PM2023-08-21T15:08:41+5:302023-08-21T15:13:32+5:30

2 Easy Home Remedy for Dark Circle : मेकअपने डार्क सर्कल घालवण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन त्यावर उपाययोजना केलेल्या केव्हाही चांगल्या.

2 Easy Home Remedy for Dark Circle : Dark circles do not reduce? 2 Simple Natural Remedies; The face will look fresh-beautiful | डार्क सर्कल काही केल्या कमी होत नाहीत? २ सोपे नैसर्गिक उपाय; चेहरा दिसेल फ्रेश-सुंदर

डार्क सर्कल काही केल्या कमी होत नाहीत? २ सोपे नैसर्गिक उपाय; चेहरा दिसेल फ्रेश-सुंदर

सौंदर्य म्हणजे चेहरा असं पक्क समीकरण अनेकींच्या डोक्यात असते. त्यामुळे चेहरा छान दिसला की आपण सुंदर दिसतो असं आपल्याला वाटते. हे काही प्रमाणात जरी खरे असले तरी आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य हेही उत्तम असणे तितकेच गरजेचे असते. कामाचा ताण, आहाराच्या पद्धती, अपुरी झोप, प्रदूषण, पचनाच्या तक्रारी यांमुळे त्वचेच्या काही ना काही तक्रारी उद्भवतातच. डार्क सर्कल आणि चेहऱ्यावरचे डाग ही बहुतांश तरुणींची आणि महिलांची अतिशय सामान्य समस्या असते. ही डार्क सर्कल आपल्या सौंदर्यात बाधा आणणारी ठरतात. नकळत यामुळे आपला चेहरा, डोळे फ्रेश न दिसता आपण थकलेले, आजारी किंवा निराश दिसतो (2 Easy Home Remedy for Dark Circle). 

डार्क सर्कल येण्यामागे ताणतणाव, अनुवंशिकता, अपुरी झोप, पोषण न होणे अशी अनेक कारणे असतात. ही डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतच असतो. हे उपाय करुनही फारसा उपयोग झाला नाही तर मेकअप करणे हा उपाय असतोच. मेकअपने डार्क सर्कल घालवण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन त्यावर उपाययोजना केलेल्या केव्हाही चांगल्या. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. प्रियांका त्रिवेदी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय सांगतात. हे उपाय कसे करायचे आणि त्याचा आपल्याला नेमका कसा फायदा होतो याविषयी... 

(Image : Google)
(Image : Google)

१. गाईचे शुद्ध तुपाचे २ थेंब बोटावर घेऊन त्याने डोळ्यांच्या खालच्या भागाला म्हणजेच डार्क सर्कल असतात त्याठिकाणी मसाज करावा. काही वेळ मसाज केल्यानंतर हे तूप डोळ्याखाली रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी उठल्यावर डोळे आणि चेहरा स्वच्छ धुवावा. तूपामध्ये नैसर्गिक बरेच गुणधर्म असल्याने डार्क सर्कलची समस्या कमी होण्यासाठी याचा निश्चितच फायदा होतो. नियमित हा उपाय केल्यास डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. खारीक खाल्ल्यानंतर आपण त्याच्या बिया फेकून देतो. पण या बिया फेकून न देता त्या किसून त्याची पूड करावी. ही पूड गुलाब पाण्यात घालून ती डोळ्यांच्या खाली रात्रभर लावून ठेवावी. चंदनाच्या पावडरप्रमाणे या बियांची पावडर होते ज्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 


Web Title: 2 Easy Home Remedy for Dark Circle : Dark circles do not reduce? 2 Simple Natural Remedies; The face will look fresh-beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.