पांढरे केस हे म्हातारपणाचे लक्षण मानले जाते. परंतु, आजकाल कमी वयात देखील मुलामुलींचे केस पांढरे दिसू लागले आहेत. आयुर्वेदानुसार जर तुमची प्रकृती पित्त दोषाची असेल तर, तुमचे केस लवकर पांढरे होऊ शकतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. मात्र, केस पांढरे होतात कारण कळत - नकळत आपल्याकडून होणाऱ्या काही चुका. २ चुकांमुळे आपले केस लवकर पांढरे होतात. आयुर्वेदतज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्या सांगतात केस नेमके कशाने पांढरे होतात(2 Gray Hair Mistakes Everyone Makes).
२ चुका कायम टाळा..
खूप गरम पाण्याने केस धुणे
केस धुण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करा असा सल्ला देण्यात येतो. मात्र, खूप गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. ज्यामुळे केस गळती, केस कोरडे - निर्जीव दिसणे, या समस्या निर्माण होतात. ज्यामुळे केस हळू - हळू पांढरे होऊ लागतात.
फक्त २० रुपयांत ३ स्टेप्स वापरुन घरच्याघरी करा पेडिक्युअर, पाय दिसतील सुंदर-स्वच्छ
केसांना केमिकल कलर किंवा डाय लावणे
काही लोकं केस पांढरे झाल्यानंतर डाय किंवा केमिकल कलरचा वापर करतात. ज्यांचे केस तिशीच्या आत पांढरे झाले असतील, त्यांनी केमिकल डाय वापरणे टाळावे. केमिकल डाय खूप हार्ष असतात, ज्यामुळे केसांचे पिगमेंट कमी होते. व स्काल्प आणि केसांना याचा दुष्परिणाम सहन करावा लागतो.
केस पांढरे होऊ नयेत म्हणून..
१. न्यूरोथेरपी ही एक आयुर्वेदिक चिकित्सा आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक तेल किंवा रस नाकात टाकला जातो. जर आपले केस पांढरे होत असतील, किंवा त्वचेची चमक वाढवायची असेल तर, न्यूरोथेरपी करून पाहा. यासाठी सकाळी किंवा झोपताना तुपाचे २ थेंब नाकामध्ये टाका. असे केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतील.
२. केसांना मुळापासून पोषण देण्यासाठी आपण केसांना तेलाने मसाज करू शकता. याशिवाय हर्बल हेअर मास्कचा देखील वापर करू शकता. केस व स्काल्पला योग्य पोषण मिळावे असे वाटत असेल तर, तेलामध्ये हिबिस्कस, कढीपत्ता, ब्राह्मी हे मुख्य घटक मिक्स करून तेल तयार करा. व हे तेल लावून केसांना मसाज करा.
पावसात भिजून आल्यावर केस धुवावेत का? पावसाच्या पाण्यामुळे खरंच केस खराब होतात का?
३. आवळा, भृंगराज, ब्राह्मी आणि कडीपत्ता, या औषधी वनस्पतींना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या मिश्रणाचे तुपासोबत नियमित सेवन केल्याने केस पांढरे होणे, केस गळणे, या समस्या कमी होऊ शकते.