चुकीची जीवनशैली व योग्य आहार न घेतल्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ज्याचा फटका केसांना देखील होतो. सध्या केसांना विविध रंग, हेअर डाय, मेहेंदीमध्ये विविध गोष्टी मिसळून लावण्याचा जणू ट्रेण्डच सुरु आहे. केसांवर केमिकल रसायनांचा वापर केल्याने, केसांचे बरेच नुकसान होते.
केस गळती, केसांची वाढ खुंटणे, केसांना फाटे फुटणे, अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे सुंदर केस पूर्णपणे खराब होतात. व चेहऱ्याची शोभा कमी होते. केसांना डाय, व केमिकल रसायनांचा वापर न करता काळे करायचे असतील, तर या टिप्स फॉलो करून पाहा. ज्यामुळे केसांना नैसर्गिक रंग येईल, व ते सुंदर काळेभोर - घनदाट दिसतील(2 Home Remedies For Darken Grey Hair).
शॅम्पू लावताना ९० % लोकं ‘ही’ चूक हमखास करतात, हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब सांगतात योग्य पद्धत
आवळा पावडर आणि खोबरेल तेल
आवळा आणि खोबरेल तेल हे दोन्ही केसांसाठी खूप चांगले मानले जाते. केस काळे करण्यासोबतच ते मजबूत बनवण्याचेही काम करतात. यासाठी एका वाटीत २ टेबलस्पून खोबरेल तेल घेऊन गरम करा. गरम झाल्यावर त्यात आवळा पावडर घालून मिक्स करा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. सकाळी ते केसांना लावा व २ तासांनी केस धुवा. या उपायामुळे केस नैसर्गिक काळे आणि मजबूत होतील.
चमचाभर तूप करेल चेहऱ्यावर जादू, चेहरा दिसेल इतका तजेलदार की फोटो फिल्टरची गरजच नाही..
आवळा आणि शिककाई
आवळा आणि शिककाईचा वापर केसांची निगा राखण्यासाठी करण्यात येतो. याचा वापर लोकं वर्षानुवर्षांपासून करत आले आहे. याच्या वापरामुळे केसांची योग्य वाढ होते, व केस घनदाट सुंदर दिसतात. यासाठी लोखंडाच्या भांड्यात ४ चमचे आवळा पावडर आणि १ चमचा शिककाई पावडर घेऊन मिसळा. यात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट केसांवर लावा, याने केस हळूहळू नैसर्गिक पद्धतीने काळे होतील.