Join us

काखेतील काळे डाग दूर करण्याचे दोन सोपे नॅचरल उपाय, काही दिवसात दिसेल फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:48 IST

Dark Underarms : ही समस्या दूर करण्यासाठी काळेतील काळे डाग कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पण आज आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठी २ सोपे घरगुती उपाय सांगत आहोत.

Dark Underarms : उन्हाळा असो वा हिवाळा काखेमधील काळपटपणाची समस्या महिलांना नेहमीच सतावत असते. काखेतील काळपटणामुळे ईच्छा असूनही अनेक महिला स्लीव लेस ड्रेस घालू शकत नाहीत. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काळेतील काळे डाग कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पण आज आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठी २ सोपे घरगुती उपाय सांगत आहोत.

काखेत काळ्या डागाची कारणे

- वेळोवेळी अंडरआर्म्सची स्वच्छता न करणे

- वेळेवर अंडरआर्म्सचे केस क्लीन न करणे

- चुकीचे डिओ वापरल्याने

- अधिक घट्ट कपडे परिधान करणे

- एखाद्या इन्फेक्शनमुळे

- स्मोकिंग केल्याने संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो, ज्यात अंडरआर्म्सचाही समावेश होतो.

- जास्त घाम येणे

- हेअर रिमूव्ह क्रीमचा वापर

पहिला उपाय

अंडरआर्म्समधील काळपटपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये एक चमचा मध, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा गुलाबजल घ्या. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. ही पेस्ट २० मिनिटे आपल्या अंडरआर्म्समध्ये लावून ठेवा. २० मिनिटांनंतर अंडरआर्म्स पाण्याचे स्वच्छ धुवा. काही दिवस हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.

दुसरा उपाय

अंडरआर्म्समधील काळपटपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात थोडं पाणी घ्या. त्यात तुरटीचा तुकडा बुडवा. रोज आंघोळ झाल्यावर तुरटी पाण्यात भिजवून काखेत फिरवा. काही दिवस हा उपाय नियमितपणे करा. फरक दिसून येईल.

इतर काही उपाय

१) अंडरआर्म्स शेव्ह करु नका तर वॅक्सिंग करा. यामुळे काळे डाग पडत नाही आणि त्वचा मुलायम राहते. 

२) बटाट्याचा रस काढा आणि १० मिनिटे काखेत चोळा. काही दिवस हा उपाय केल्यास फायदा मिळेल.

३) लिंबाची साल काखेत लावल्यानेही काळा रंग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्याठिकाणची मृत त्वचाही निघून जाण्यास मदत होते.

४) काकडीमध्येही ब्लीचिंग एजंट असतात. काकडीच्या रसात थोडा लिंबाचा रस आणि हळद मिसळा. या पेस्टला ३० मिनिटे लावून ठेवा. हळूहळू रंग उजळण्यास मदत होईल.

५) बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि त्याची हलकी पेस्ट बनवा. या पेस्टने काखेमध्ये स्क्रब करा. आठवड्यातून दोन वेळा याचा प्रयोग करा.

६) प्रमाणापेक्षा जास्त घट्ट कपडे परिधान केल्यास अंडरआर्म्सची स्कीन काळी पडते. घट्ट कपड्यांमुळे घर्षण होतं, जे इन्फेक्शनमध्ये बदलतं. त्यामुळे जास्त घट्ट कपडे वापरु नका. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स