Lokmat Sakhi >Beauty > किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन गायब- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो 

किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन गायब- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो 

2 Ingredients In Kitchen For Radiant Glowing Skin: स्वयंपाक घरातले २ पदार्थ जर तुम्ही चेहऱ्यावर नियमितपणे लावले तर चेहऱ्यासाठी इतर कोणतेही सौंदर्योपचार करण्याची गरज पडणार नाही.. (best home remedies for reducing pigmentation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2024 12:34 PM2024-09-02T12:34:29+5:302024-09-02T19:03:58+5:30

2 Ingredients In Kitchen For Radiant Glowing Skin: स्वयंपाक घरातले २ पदार्थ जर तुम्ही चेहऱ्यावर नियमितपणे लावले तर चेहऱ्यासाठी इतर कोणतेही सौंदर्योपचार करण्याची गरज पडणार नाही.. (best home remedies for reducing pigmentation)

2 ingredients in kitchen for radiant glowing skin, how to get flawless glass skin like korean girls, best home remedies for reducing pigmentation | किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन गायब- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो 

किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन गायब- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो 

Highlightsबटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असतील चेहऱ्यावर खूप जास्त टॅनिंग असेल तर बटाट्याचा रस नियमितपणे चेहऱ्याला लावा.

बहुतांशजणी अशा असतात की त्या आपल्या रोजच्या कामांमध्ये खूप अडकून गेलेल्या असतात. त्यामुळे स्वतःच्या त्वचेकडे, सौंदर्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच नसतो. त्यामुळे मग कमी वयातच चेहरा डल दिसू लागतो, चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स, पिगमेंटेशन वाढतात (best home remedies for reducing pigmentation). डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात तसेच ॲक्ने आणि पिंपल्सचाही त्रास होतो. असे सगळे प्रॉब्लेम्स चेहऱ्यावर दिसू लागले की मग आपोआपच चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतो. तुमच्याही बाबतीत असंच झालं असेल तर इतर काहीही न करता फक्त २ पदार्थ नियमितपणे चेहऱ्यावर लावा (2 Ingredients In Kitchen For Radiant Glowing Skin). त्यामुळे तुमच्या त्वचेच्या बऱ्याचशा समस्या कमी होतील आणि चेहऱ्यावर छान नॅचरल ग्लो येईल. (how to get flawless glass skin like korean girls)

पिगमेंटेशन जाऊन चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय 

 

चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, ॲक्ने, पिंपल्स, डार्कस्पॉट्स जाऊन चेहऱ्यावर छान ग्लो यावा असं वाटत असेल तर त्यासाठी कोणते २ पदार्थ नियमितपणे चेहऱ्यावर लावावेत याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या instagram पेजवर शेअर करण्यात आला आहे. ते २ पदार्थ नेमके कोणते ते पाहा...

 

१. बटाट्याचा रस

बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असतील चेहऱ्यावर खूप जास्त टॅनिंग असेल तर बटाट्याचा रस नियमितपणे चेहऱ्याला लावा.

तुमच्यावर कोणी विनाकारण चिडत असेल तर काय कराल? बीके शिवानी सांगतात खास उपाय

मुलतानी माती, बेसन अशा कोणत्याही फेसमास्कमध्ये टाकून तुम्ही बटाट्याचा रस चेहऱ्यासाठी वापरू शकता. बटाट्याचा रस आणि एलोवेरा जेल हे मिश्रण एकत्र करून डोळ्यांभोवती लावल्यास डार्क सर्कल्स बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

 

२. राईस वॉटर 

चेहऱ्यावर छान नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर राईस वॉटरसारखा दुसरा पर्याय नाही. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी हा एक अतिशय स्वस्तात मस्त उपाय आहे.

५- ६ वर्षांनी तरुण दिसाल- १ मिनिटाचा सोपा उपाय, सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर येईल तेज

राईस वॉटर आणि गुलाब जल समप्रमाणात घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुऊन हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. त्वचेसाठी हे एक उत्तम टॉनिक असून त्यामुळे चेहऱ्यावर छान ग्लो येण्यास निश्चितच मदत होईल.


 

Web Title: 2 ingredients in kitchen for radiant glowing skin, how to get flawless glass skin like korean girls, best home remedies for reducing pigmentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.