Join us  

रोज सकाळी ५ मिनिटं या ५ पदार्थांनी चेहऱ्याला करा मसाज, चाळीशी उलटली तरी चेहरा चमकेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 5:33 PM

2 Minute Morning Facial Massage For Glowing Skin : A 5-minute morning massage with natural ingredients is all you need for glowing skin : सकाळी आपण स्वत:ला फक्त ५ मिनिटंही देऊ शकत नाही का?

बदलेल्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या त्वचेच्या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. विशेष करून चेहरा तेलकट होणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे, तसेच चेहऱ्यावरील तेलकटपणामुळे आपली त्वचा काळपट पडते. ज्यामुळे त्वचेच्या अधिक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. प्रत्येकालाच आपली त्वचा निरोगी आणि कायम तरुण दिसायला हवी अशी इच्छा असते. आपली त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी काहीजणी तासंतास मास्क लावतात किंवा महागड्या क्रिम्सचा वापर करतात. याचबरोबर काहीवेळा आपण पार्लरला जाऊन स्किनसाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करतो. परंतु काहीवेळा आपल्याला या सगळ्या गोष्टी नेहमी (Best Face Massage for Glowing Skin) करणे शक्य होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती नैसर्गिक गोष्टींनी चेहऱ्याचा मसाज करून  आपली त्वचा निरोगी आणि कायम तरुण ठेवू शकतो.    

महागड्या सौंदर्य उत्पादनांवर खर्च करण्याऐवजी, आपण घरच्या घरी उपलब्ध (Facial Massage Routine for Glowing Skin and a Slimmer Face) असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींनी चेहऱ्याचा मसाज करून आपली त्वचा निरोगी आणि तरुण ठेवू शकतो. सकाळी फक्त पाच मिनिटे काढून चेहऱ्याचा मसाज करून आपण त्वचेला आवश्यक पोषण देऊ शकतो. मसाज करताना आपण कोणकोणत्या पदार्थांचा वापर करु शकतो, जेणेकरुन आपल्या त्वचेला अधिक फायदा होईल ते समजून घेऊयात(A 5-minute morning massage with natural ingredients is all you need for glowing skin).

त्वचेला मसाज करण्यासाठी नेमक कोणत्या गोष्टींचा वापर करावा ?   

१. खोबरेल तेल :- कोरडी त्वचा असणाऱ्यांनी सकाळी खोबरेल तेलाने त्वचेला मसाज करावा. खोबरेल तेलातील अनेक पोषक तत्वे आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतात. खोबरेल तेल त्वेचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास, कोरडेपणा दूर करण्यास आणि त्वचेवरील एजिंगच्या बारीक खुणा कमी करण्यास मदत करते. मसाज केल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा.

केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...  

२. मध आणि हळद पावडर :- मध आणि हळद हे दोन्ही नैसर्गिक पदार्थ त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या दोन्ही पदार्थांचे मिश्रण नियमितपणे चेहऱ्याला लावल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात. एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून त्याने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेवर चमक येते. मध आणि हळदीमध्ये सूज कमी करण्याचा गुणधर्म असतो. यामुळे त्वचेला पुरेसे पोषणही मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी दिसते.

३. पपईची पेस्ट :- पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि फोलेट ॲसिड असते. हे सर्व त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे महत्वाचे काम करतात. सकाळी पपईच्या लगद्याने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेवरील डेड स्किन दूर होते आणि पिंपल्सची समस्या देखील कमी होते. याशिवाय पपईमध्ये असलेले विविध पोषक तत्वे त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करतात. 

ओल्या केसांवर तेल लावताय? थांबा, त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात योग्य पद्धत, नाहीतर केसांचे त्रास वाढतील...

४. तीळाचे तेल :- तिळाच्या तेलात व्हिटॅमिन 'ई' असते. व्हिटॅमिन 'ई' त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारते. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळाच्या तेलामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

५. शिया बटर :- शिया बटरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व 'ए' आणि 'ई' असतात. शिया बटरने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. शिया बटर हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक घटक आहे. शिया बटरच्या नियमित वापराने आपल्याला मऊ, मुलायम  आणि चमकदार त्वचा मिळू शकते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी