Lokmat Sakhi >Beauty > थंडीमुळे प्रमाणाबाहेर केस गळतात? मसाजसाठी वापरा २ तेलं, केस वाढतील लांब, होतील मजबूत

थंडीमुळे प्रमाणाबाहेर केस गळतात? मसाजसाठी वापरा २ तेलं, केस वाढतील लांब, होतील मजबूत

2 Oils for Hair Growth Hair Care Tips : आपण लावत असलेल्या तेलामध्ये बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 02:41 PM2023-02-03T14:41:17+5:302023-02-03T14:55:05+5:30

2 Oils for Hair Growth Hair Care Tips : आपण लावत असलेल्या तेलामध्ये बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

2 Oils for Hair Growth Hair Care Tips : Excessive hair loss due to cold? Use 2 oils for massage, hair will grow long and strong | थंडीमुळे प्रमाणाबाहेर केस गळतात? मसाजसाठी वापरा २ तेलं, केस वाढतील लांब, होतील मजबूत

थंडीमुळे प्रमाणाबाहेर केस गळतात? मसाजसाठी वापरा २ तेलं, केस वाढतील लांब, होतील मजबूत

Highlightsकेस धुण्याच्या तासभर आधी हे तेल केसांच्या मुळांना लावून ठेवावे आणि त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत.    तेलाची निवड करताना योग्य ती काळजी घेतली तर फायदा होतो..

केस गळणे ही तरुणी आणि महिलांमध्ये अतिशय सामान्य असलेली समस्या. “माझे केस इतके गळतात की आता मी टकली होणार आहे.” “केस गळून गळून मागे आता फक्त एक शेंडी राहीली आहे.” अशी वाक्य नेहमी आपल्या कानावर पडतात. कंगवा घातला की त्यात खूप केस गळून बाहेर येतात. त्यामुळे दिवसेंदिवस आपले केस खूप पातळ होत चालले आहेत असेही आपण वारंवार ऐकतो. केस गळण्यामागे अनेक कारणं असतात. कधी केसांचे योग्य पद्धतीने पोषण होत नसल्याने, केमिकल्सचा अतिवापर, विविध प्रकारच्या रासायनिक ट्रीटमेंटस, कोरडेपणा यांमुळे केस गळती सुरू होते (2 Oils for Hair Growth Hair Care Tips). 

आता हे जास्त प्रमाणात गळत असलेले केस वाचवायचे कसे असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. यासाठी कधी आपण मित्र-मैत्रीणींचे सल्ले घेतो, कधी गुगलवर उपाय शोधतो तर कधी पार्लरवालीचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने उपाय करतो. याचा म्हणावा तसा उपयोगो होतोच असे नाही. पण तेलाने मसाज केल्यास केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते आणि केसगळतीही काही प्रमाणात कमी होते. तेल म्हटल्यावर आपण साधारणपणे खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावतो. पण त्याने गळणाऱ्या केसांना पुरेसे पोषण मिळतेच असे नाही. अशावेळी आपण लावत असलेल्या तेलामध्ये बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. कांद्याचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. 

१. कांद्याचे तेल 

कांद्याचे तेल केसांना आतून पोषण देणारे असते, त्यामुळे केस मजबूत होण्यासाठी या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो. कांद्याचे तेल बाजारात सहजासहजी मिळतेच असे नाही. मात्र आपण घरीही कांद्याचे तेल तयार करु शकतो. मिक्सरमध्ये कांद्याची पेस्ट करायची. खोबरेल तेल गॅसवर गरम करुन त्यात ही पेस्ट घालायची. चांगली एकजीव झाली की हे तेल गाळून एका बरणीत किंवा बाटलीत भरुन ठेवायचे. यामुळे केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. ऑलिव्ह ऑईल 

ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते असे आपण बरेचदा ऐकतो. पण त्याचा वापर करतोच असे नाही. त्या तेलाला एकप्रकारचा उग्र वास येत असल्याने आपण हे तेल वापरणे टाळतो. मात्र बरेचदा स्वयंपाकातही हे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटस असल्याने केस मजबूत करण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. केस धुण्याच्या तासभर आधी हे तेल केसांच्या मुळांना लावून ठेवावे आणि त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत.    

 

Web Title: 2 Oils for Hair Growth Hair Care Tips : Excessive hair loss due to cold? Use 2 oils for massage, hair will grow long and strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.