Lokmat Sakhi >Beauty > महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

How To Use Aloe Vera Gel On Your Face At Night : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची असेल, तर आपणही एलोवेरा जेल आपल्या नाईट केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 08:31 PM2023-08-30T20:31:59+5:302023-08-30T20:59:19+5:30

How To Use Aloe Vera Gel On Your Face At Night : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची असेल, तर आपणही एलोवेरा जेल आपल्या नाईट केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता....

2 Simple Ways To Use Aloe Vera Gel On Face At Night. | महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्किन केअर रुटीन फॉलो करत असतो. त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी काहीजण तर सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही वेळा वेगवगेळ्या प्रकारचे स्किन केअर रुटीन फॉलो करत असतात. काहीवेळा आपण हे स्किन रुटीन फॉलो करताना महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा हमखास वापर करतो. या महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा आपल्या त्वचेवर क्वचितच फरक पडलेला दिसून येतो. याउलट आपण काहीवेळा काही नैसर्गिक गोष्टींचा वापर स्किन केअर रुटीनमध्ये करतो तेव्हा त्याचे उत्तम रिझल्ट मिळतात.

स्किन केअरसाठी व सगळ्याच प्रकारच्या त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणजे एलोवेरा जेल (Aloe Vera Gel). चेहऱ्यावरील पिंपल्स पासून ते टॅनिंगमुळे निस्तेज झालेल्या त्वचेपर्यंत अशा अनेक समस्यांवर एलोवेरा जेल (Aloe Vera Gel) अतिशय फायदेशीर ठरते. रात्री झोपताना आपण नाईट केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायजर किंवा लोशन तर लावतोच. याउलट आपण नाईट केअर रुटीनमध्ये एलोवेरा जेलचा वापर करु शकतो. आपल्या नाईट केअर रुटीनमध्ये एलोवेरा जेलचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने करावा, हे समजून घेऊयात(2 Simple Ways To Use Aloe Vera Gel On Face At Night).

नाईट स्किन केअर रुटीनमध्ये एलोवेरा जेल वापरण्याच्या २ सोप्या पद्धती...  

१. एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई :- एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतात. म्हणून, आपण आपल्या नाईट केअर रुटीनमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई या दोन्हींचा वापर करू शकता(Vitamin E Capsule &  Aloe Vera Gel For Face Overnight Benefits).

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल काढून घ्यावे. 
२. आता त्यात व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल्स फोडून घालाव्यात. 
३. यानंतर, हे मिश्रण चांगले मिसळून व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे. 
४. आता हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू द्या.
५. हे मिश्रण लावताना आपण बोटांनी हलकेच मसाज देखील करु शकता. 
६. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा फक्त पाण्याने धुवून स्वच्छ करा.

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई च्या फेसमास्कचा वापर रोज केल्याने त्वचा मॉइश्चराइज होते आणि निरोगी राहते. याचबरोबर त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत मिळते. 

चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

२. टी ट्री ऑइल आणि एलोवेरा जेल :- टी ट्री ऑइल त्वचेसाठी अधिक चांगले असते. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मुरुम आणि त्वचेच्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. यासाठी आपण एलोवेरा जेलसोबतच टी ट्री ऑइलचा देखील वापर करु शकता(Benefits of Using Aloe Vera Gel with Tea Tree Oil). 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल काढून घ्यावे. 
२. आता त्या एलोवेरा जेलमध्ये टी ट्री ऑइलचे ३ ते ४ थेंब घाला. 
३. आता हे मिश्रण चांगले मिसळा.
४. आता हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा व पुढील ३० मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे.
५. यानंतर चेहरा मऊ सुती कापडाने पुसून स्वच्छ करा.
६. चेहरा पुसून स्वच्छ केल्यानंतर त्यावर पुन्हा काहीही लावू नका. 

ग्लिसरीनमध्ये घाला स्वयंपाकघरातल्या ४ गोष्टी फक्त १ चमचा, आणि बघा चेहरा चमकेल - एकही डाग राहणार नाही...

टी ट्री ऑइल आणि एलोवेरा जेल च्या फेसमास्कचा वापर रोज केल्याने त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या, काळे डाग कमी करण्यास मदत होते.

Web Title: 2 Simple Ways To Use Aloe Vera Gel On Face At Night.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.