सौंदर्य म्हणजे चेहरा हेच आपल्या डोक्यातील समीकरण असते. त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याकडे आपण बारकाईने लक्ष देतो पण शरीराच्या इतर अवयवांकडे मात्र आपण म्हणावे तितके लक्ष देतोच असे नाही. हवेतील धूळ, प्रदूषण, ऊन यांचा ज्याप्रमाणे चेहऱ्यावर परीणाम होत असतो त्याचप्रमाणे हात, पाय, याच्या त्वचेवरही याचा परीणाम होत असतो. थंडीच्या दिवसांत तर शरीराची त्वचा इतकी कोरडी पडते की ती दिसतेही रुक्ष आणि काळपट. पायाची बोटं, नखं मातीमुळे आणि भेगांमुळे अतिशय खराब दिसायला लागतात. मात्र रोजच्या धावपळीत आपल्याला पाय आणि हातांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोच असे नाही (2 Step Easy Pedicure at home).
पण सणवार किंवा लग्नकार्य असेल तर आपले पाय छान गोरेपान दिसावेत असं आपल्यााल साहजिकच वाटतं. मग एकाएकी पाय खराब झाल्याचं जाणवतं आणि आपण पार्लर गाठतो. किमान ४०० ते ७०० रुपये घालून केले जाणारे हे पेडिक्युअर काही तासांसाठी छान दिसते पण नंतर पायांची पुन्हा जैसे थे अशीच अवस्था येते. पण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने पेडीक्युअर करायचे असल्यास त्यासाठी योग्य ती माहिती असायला हवी. पाहूयात फक्त २ स्टेपमध्ये झटपट पेडीक्युअर कसे करायचे.
१. एका पाय बुडतील इतक्या आकाराच्या टबमध्ये मीठ आणि शाम्पू घालून त्यामध्ये गरम पाणी घाला.
२. यानंतर एखाद्या खराब झालेल्या टूथब्रशने किंवा पाय साफ करण्याच्या ब्रशने पाय स्वच्छ घासून घ्या.
३. मग पायांची नखे व्यवस्थित एका शेपमध्ये कापून घ्या.
४. त्यानंतर २ चमचे गव्हाचे पीठ, त्यामध्ये थोडी टूथपेस्ट आणि टोमॅटोचा रस एकत्र करा.
५. पाणी घालून याचा एक पॅक तयार करा आणि तो पायांना सगळ्या बाजूने एकसारखा लावा आणि १० मिनिटांसाठी तसाच ठेवून द्या.
६. यानंतर स्क्रबरने हा पॅक थोडा घासा ज्यामुळे त्वचेवरचे काळे डाग निघून जाण्यास मदत होईल.
७. मग पाय पाण्यात स्वच्छ धुवून घ्या, पाय एकदम गोरेपान दिसण्यास मदत होईल.