Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

Which Colour Blouse Is Suitable For All Saree: पुढे सांगितलेले २ प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर ते तुमच्याकडच्या जवळपास सगळ्याच साड्यांवर चालतील. बघा ते ब्लाऊज नेमके कोणते...(2 types of blouse that goes on each and every type of saree)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2024 03:13 PM2024-11-25T15:13:37+5:302024-11-25T15:14:42+5:30

Which Colour Blouse Is Suitable For All Saree: पुढे सांगितलेले २ प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर ते तुमच्याकडच्या जवळपास सगळ्याच साड्यांवर चालतील. बघा ते ब्लाऊज नेमके कोणते...(2 types of blouse that goes on each and every type of saree)

2 types of blouse that goes on each and every type of saree, Which blouse suits on every saree? | फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

Highlightsदोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे तयार ठेवा आणि डिझायनर, काठपदर अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर घाला

हल्ली साड्या नेसण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. त्यामुळे साडी घ्या, त्यावरचं ब्लाऊज शिवा यासाठी जास्त पैसे खर्च करायला अनेकींच्या जिवावर येतं. कधीतरीच साडी नेसायची असते. त्यामुळे मग ब्लाऊज शिवून घ्यायला किंवा रेडिमेड घ्यायलाही परवडत नाही. हल्ली तर अशी कधीतरीच साडी नेसणाऱ्या ज्या महिला किंवा तरुणी आहेत त्या साडी खरेदीवर पैसे खर्च करण्यापेक्षा बहिणीची, आईची, मैत्रिणीची साडी नेसण्यास प्राधान्य देतात. अशावेळी आपल्याकडे असे काही ब्लाऊज असायला हवेत जे आपण कोणत्याही प्रकारच्या आणि रंगाच्या साडीवर घातले तरी ते सहज मॅच होतील. तसंही आता तंतोतंत मॅचिंग करण्याचा जमाना नाही. हल्ली कॉन्ट्रास्ट रंगाची फॅशन ट्रेण्डमध्ये आहे (Which Colour Blouse Is Suitable For All Saree?). त्यामुळे हे दोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे तयार ठेवा आणि डिझायनर, काठपदर अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर घाला (Which blouse suits on every saree?).. स्टायलिश, आकर्षक लूक मिळून चारचौघीत नक्कीच उठून दिसाल.(2 types of blouse that goes on each and every type of saree)

सगळ्याच साड्यांवर चालणारे २ प्रकारचे ब्लाऊज

 

१. काठपदर साड्यांसाठी

सरसकट सगळ्याच रंगाच्या आणि प्रकारच्या काठपदर साडीवर घालण्यासाठी ब्लाऊज बघत असाल तर सरळ पैठणी ब्लाऊज शिवा. पैठणी ब्लाऊज जवळपास सगळ्याच साडीवर मॅच होतं.

हिवाळ्यात धुणी- भांडी केल्याने हात आणखीनच खरखरीत होतात? ३ गोष्टी करा, हात होतील मुलायम

यासाठी कपडा निवडताना त्याचा बेस सोनेरी किंवा फिकट गुलाबी रंगाचा असावा. कारण हे दोन रंग बहुतांश साड्यांवर शोभून दिसतात. पैठणीच्या बाह्या असल्यामुळे या ब्लाऊजवर कोणतेही थ्रेड वर्क, अरी वर्क, मिररवर्क करण्याची गरज नाही.

 

२. डिझायनर साडी

डिझायनर साडीवर घालायला ब्लाऊज पाहिजे असेल तर त्यासाठी शिफॉन किंवा सिल्कचा कपडा घेऊन त्याची बॉडी शिवा आणि बाह्यांना नेटचा कपडा लावा.

अनारकली ड्रेसचे ५ सुंदर पॅटर्न्स; लग्नसराईसाठी ठरेल 'परफेक्ट चॉईस'- दिसाल स्टायलिश, आकर्षक

डिझायनर साडीवर ब्लाऊज शिवताना त्याचा रंग काळा, सोनेरी, चंदेरी किंवा पिच कलर असावा. कोणत्याही रंगाच्या साडीवर ते अगदी सहज मॅच होऊन जाईल. 

 

Web Title: 2 types of blouse that goes on each and every type of saree, Which blouse suits on every saree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.