Lokmat Sakhi >Beauty > डाळिंब खा पण साल फेकून देऊ नका, २ भन्नाट उपयोग- लालचुटूक डाळिंब म्हणजे त्वचेसाठी वरदान

डाळिंब खा पण साल फेकून देऊ नका, २ भन्नाट उपयोग- लालचुटूक डाळिंब म्हणजे त्वचेसाठी वरदान

Beauty Tips: डाळिंबाच्या सालाचे हे काही उपयोग तुम्ही वाचले, तर यापुढे तुम्ही ती टाकून देणार नाही....(Uses of pomegranate peel for skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 07:37 PM2023-08-11T19:37:06+5:302023-08-11T19:38:07+5:30

Beauty Tips: डाळिंबाच्या सालाचे हे काही उपयोग तुम्ही वाचले, तर यापुढे तुम्ही ती टाकून देणार नाही....(Uses of pomegranate peel for skin)

2 Uses of pomegranate peel for skin, pomegranate peel scrub, pomegranate peel for flawless glowing skin | डाळिंब खा पण साल फेकून देऊ नका, २ भन्नाट उपयोग- लालचुटूक डाळिंब म्हणजे त्वचेसाठी वरदान

डाळिंब खा पण साल फेकून देऊ नका, २ भन्नाट उपयोग- लालचुटूक डाळिंब म्हणजे त्वचेसाठी वरदान

Highlightsडाळिंबाच्या दाण्यांपेक्षाही जास्त अँटी ऑक्सिडंट्स डाळिंबाच्या सालींमधे असतात.

डाळिंब (pomegranate) हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पण त्याचा खरा हंगाम मान्सूनमध्ये सुरू होतो. त्यामुळे सध्या बाजारात भरपूर प्रमाणात डाळिंब आले आहेत. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सिडंट्स, शरीरासाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. त्यामुळे तब्येतीसाठी तर डाळिंब खाणे फायद्याचेच आहे. पण त्याची सालेदेखील त्वचेसाठी अतिशय गुणकारी असतात. त्वचेसाठी डाळिंबाच्या सालाचा कसा उपयोग करायचा (pomegranate peel for flawless glowing skin), ते आता आपण पाहूया  

 

डाळिंबाच्या सालाची पावडर कशी करायची?
डाळिंबाच्या सालाचा उपयोग करण्याआधी ती उन्हामध्ये वाळायला ठेवा. २ ते ३ दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर सालं चांगली वाळतील. त्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची बारीक पावडर करा.

फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

त्वचेसाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग
१. डाळिंबाच्या सालाची पावडर १ टेबलस्पून घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस आणि अर्धा टेबलस्पून मध घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि स्क्रब म्हणून त्वचेसाठी वापरा. चेहऱ्यासोबत गळा, मान आणि हातांनाही तुम्ही हे स्क्रब वापरू शकता. यामुळे डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा मऊ, मुलायम होईल. या उपायामुळे टॅनिंग कमी होण्यासही मदत होते.

 

२. डाळिंबाच्या सालांबाबत तज्ज्ञ असं सांगतात की डाळिंबाच्या दाण्यांपेक्षाही जास्त अँटी ऑक्सिडंट्स डाळिंबाच्या सालींमधे असतात. त्यामुळे त्यांचा काढा करून प्यायल्यास त्वचेला आणि आरोग्याला चांगला फायदा होतो.

प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ

काढा तयार करण्यासाठी डाळिंबाच्या सालींची १ चमचा पावडर १ कप पाण्यात टाकून उकळवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. त्यात ५ ते ६ थेंब लिंबाचा रस घाला.
 

Web Title: 2 Uses of pomegranate peel for skin, pomegranate peel scrub, pomegranate peel for flawless glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.