Join us  

कमी वयात चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागल्या? खोबरेल तेलाचे २ उपाय, रात्री लावा-सकाळी चमक पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 11:25 AM

2 Ways Coconut Oil Can Help You Get Rid Of Wrinkles : आता चेहरा वयस्कर दिसणार नाही, चमचाभर खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, चेहरा दिसेल कायम चिरतरुण-फ्रेश

या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. प्रत्येक जण वयानुसार बदलत जातो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी तारुण्य टिकून राहत नाही. वय वाढले की चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग, फाईन लाईन्स, सुरकुत्या (Wrinkles) दिसू लागतात. या वृद्धत्वाच्या लक्षणांमुळे चेहरा आणखी वयस्कर दिसू लागते. अनेकांच्या कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या सुरकुत्या डोळे, तोंड आणि कपाळाजवळ दिसतात. यावर वेळीच उपाय केल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

शिवाय चेहरा कायम चिरतरुण दिसू शकेल. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये म्हणून महागडे प्रॉडक्ट्सपेक्षा खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेलाचा वापर फक्त केसांसाठी नसून, चेहऱ्यावरही होऊ शकते. सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा (Coconut oil) वापर कसा करावा? यामुळे खरंच सुरकुत्या कमी होऊ शकतील का? पाहा(2 Ways Coconut Oil Can Help You Get Rid Of Wrinkles).

सुरकुत्या घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो. खोबरेल तेलात फ्री - रॅडिकल्सशी लढण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे सुरकुत्या दूर होऊ शकतात. यासाठी आपण झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून मसाज करू शकता. यामुळे स्किन रिपेअर होते, शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा?

खोबरेल तेलात मिसळा एरंडेल तेल

सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण खोबरेल आणि एरंडेल तेलाचा वापर करू शकता. या तेलामध्ये दाहक-विरोधी, अँटी-रिंकल्स गुणधर्म असतात. जे सुरकुत्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी एका वाटीत एक चमचा खोबरेल तेल घ्या, त्यात थोडं एरंडेल तेल मिक्स करा. त्यानंतर झोपण्यापूर्वी सर्क्युलेशन मोशनमध्ये हातावर तेल घेऊन मसाज करा. सकाळी चेहरा पाण्याने धुवा. नियमित असे केल्याने सुरकुत्या कमी होतील.

डार्क सर्कलमुळे सतत मेकअप करावा लागतो? ३ घरगुती उपाय, मेकअप न करताही दिसाल सुंदर

खोबरेल तेलात मिसळा मध

खोबरेल तेल आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरते. मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. तर, खोबरेल तेलातील गुणधर्म सुरकुत्या दूर करतात. ज्यामुळे स्किन चमकदार दिसते. यासाठी एका वाटीत एक चमचा खोबरेल तेल घ्या, त्यात २ ते ३ थेंब मधाचे घाला. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा. काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी