खूप काम, धावपळ, पळापळ झाली की आपल्याला थोडा वेळ उसंत हवी असते. थोडं रिलॅक्स व्हावं वाटतं. रिलॅक्स होण्यासाठी आपण थोडा आराम करतो, झोप घेता आणि पुन्हा फ्रेश होतो.. तसंच आपल्या त्वचेचंही असतं. ती पण थकते, दमते.. तिचा थकवा (home remedies for dryness of skin) फक्त ओळखता आला पाहिजे.
खूप जास्त दगदग, ताण- तणाव, उन्हात फिरणे किंवा प्रदुषण या सगळ्या गोष्टींचा वारंवार सामना करावा लागला की त्वचा थकून जाते. त्यामुळेच ती काळवंडते किंवा ड्रायनेस (dry skin) वाढू लागतो. अशावेळी त्वचेचा थकवा घालवून तिला पुन्हा फ्रेश करण्याची गरज असते. त्वचेला रिलॅक्स (skin relaxing facepacks) करायचं असेल तर हे ३ उपाय करा. घरच्याघरी तयार केलेले हे खास स्किन रिलॅक्सिंग फेसपॅक तुम्ही जेव्हा त्वचेवर लावता, तेव्हा ग्लो निश्चितच वाढतो आणि चेहरा एकदम फ्रेश, टवटवीत दिसू लागतो.
१. दही- स्ट्रॉबेरी फेसपॅकसध्या बाजारात स्ट्रॉबेरी मिळत आहेत, तोपर्यंत त्या खाऊनही घ्या आणि त्वचेसाठीही त्यांचा उपयोग करून घ्या. स्ट्रॉबेरी आणि दही या दोघांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अतिशय पोषक आहेत. हा फेसपॅक तयार करण्यासाठी स्टॉब्रेरी किसून त्याचा गर काढून घ्या. एक चमचा स्ट्रॉबेरीचा गर आणि एक चमचा दही एकत्र करा. चेहरा ओला करून हा पॅक चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. काळवंडलेल्या त्वचेसाठी हा फेसपॅक उत्तम आहे.
२. दही- टरबूज फेसमास्कत्वचा कोरडी होऊन निस्तेज दिसत असेल, तर हा फेसमास्क लावावा. उन्हाळ्यात तर हा फेसमास्क वापरणे अतिशय उपयुक्त ठरेल. फेसमास्क तयार करण्यासाठी टरबूजाचे छोटे छोटे क्युब घ्या. क्युबचा एक भाग दह्यात बुडवा आणि तोच भाग त्वचेवर ठेवून हलक्या हाताने गोलाकार दिशेने त्वचेची मसाज करा. ३ ते ४ मिनिटे मसाज केल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा मऊ, मुलायम होण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
३. मध आणि काकडीकाकडी किसून घ्या आणि तिचा दोन चमचे रस काढा. यामध्ये अर्धा चमचा मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि तो लेप चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय चेहऱ्याला थंडावा तर देतोच, पण त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही मदत करतो.