Join us  

काही केल्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं जातच नाहीत? ३ सोपे उपाय- ८ दिवसांत डार्क सर्कल्स गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2024 3:45 PM

3 Amazing Home Remedies For Reducing Dark Circles: डोळ्यांखालची काळी वर्तुळं खूप वाढली असतील तर लगेचच हे काही सोपे उपाय करून पाहा. (how to get rid of dark circles?)

ठळक मुद्देचेहऱ्याची आकर्षकता कमी होऊ द्यायची नसेल तर डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हे काही उपाय लगेचच सुरू करा

दिवाळी नुकतीच झाली. त्यामुळे आता दिवाळीपुर्वी आपण जे काही फेशियल, क्लिनअप केलं त्याचा चेहऱ्यावर झालेला परिणाम ओसरू लागलेला आहे. अशामध्येच काही जणींना अगदी ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळं. डार्क सर्कल्समुळे चेहऱ्यावरची चमक थोडी ओसरल्यासारखी वाटते. कारण डोळे जास्त खोल गेल्यासारखे दिसतात (major reasons for dark circles). चेहरा आजारी असल्याप्रमाणे ओढलेला दिसतो (how to get rid of dark circles?). त्यामुळेच अशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्याची आकर्षकता कमी होऊ द्यायची नसेल तर डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हे काही उपाय लगेचच सुरू करा.(3 amazing home remedies for reducing dark circles)

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय

 

१. बटाट्याचा रस

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ डिंपल जांगडा यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे.

फक्त ३ आठवड्यात त्वचेवर येईल सोनेरी ग्लो, फक्त 'हा' ज्यूस प्या! पूरळ- पिगमेंटेशनही कमी होईल

त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे बटाट्याचा रस. बटाट्याच्या रसामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय बटाट्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे त्वचेला पुरेपूर पोषण मिळतं आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

 

२. बदामाचं तेल

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे त्वचेसाठी पौष्टिक असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. दररोज रात्री झोपण्यापुर्वी बदाम तेलाने डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज केल्यास डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात.

 

३. केशर

केशराच्या २ ते ३ काड्या चमचाभर दुधात भिजत घाला आणि दररोज रात्री झोपण्यापुर्वी या दुधाने डोळ्यांभोवती मसाज करा. सकाळी चेहरा धुवून टाका. केशरमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फ्लॅवनॉईड्स त्वचेला पोषण देऊन डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात.

रोजच्या वापरासाठी मोत्याचे कानातले घ्यायचे? पाहा कॉलेज-ऑफिसला जाताना घालण्यासाठी ८ नाजूक- सुंदर डिझाईन्स

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येण्याची कारणं

१. जर तुम्हाला रात्री बराच वेळ अंधारात मोबाईल, टीव्ही बघण्याची सवय असेल तर त्यामुळेही डार्क सर्कल्स होऊ शकतात.

२. नेहमीच रात्री उशिरा झाेपणे, अपुरी झोप होणे ही देखील डार्क सर्कल्स येण्याची कारणं आहेत.

३. फळं, पालेभाज्या पुरेशा प्रमाणात न खाणे, आहारातून योग्य प्रमाणात पोषण न मिळणे यामुळेही डार्क सर्कल्स होतात. त्यामुळे असं काही तुमच्याही बाबतीत होत आहे का, हे एकदा तपासून पाहा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीडोळ्यांची निगाबटाटा