Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं कमी करणारे ३ सोपे आयुर्वेदिक उपाय, केस दाट होतील- आरोग्यही सुधारेल

केस गळणं कमी करणारे ३ सोपे आयुर्वेदिक उपाय, केस दाट होतील- आरोग्यही सुधारेल

3 Ayurvedic Remedies To Reduce Hair Fall: केस गळत असतील तर अगदी आजपासूनच हे काही उपाय करून पाहा. हे उपाय केस गळणं तर कमी करतीलच पण आरोग्याच्या इतर तक्रारीही दूर होतील. (what to do for intensive hair loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 09:12 AM2023-12-26T09:12:13+5:302023-12-26T09:15:01+5:30

3 Ayurvedic Remedies To Reduce Hair Fall: केस गळत असतील तर अगदी आजपासूनच हे काही उपाय करून पाहा. हे उपाय केस गळणं तर कमी करतीलच पण आरोग्याच्या इतर तक्रारीही दूर होतील. (what to do for intensive hair loss)

3 Ayurvedic remedies for reducing hair fall, How to reduce hair loss, what to do for intensive hair loss | केस गळणं कमी करणारे ३ सोपे आयुर्वेदिक उपाय, केस दाट होतील- आरोग्यही सुधारेल

केस गळणं कमी करणारे ३ सोपे आयुर्वेदिक उपाय, केस दाट होतील- आरोग्यही सुधारेल

Highlightsआपल्या आहारातून केसांना योग्य पोषण मिळालं नाही, तर त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि केस गळणं वाढत जातं.

हल्ली केस गळण्याची समस्या खूपच जास्त वाढली आहे. काही काही जणींना तर कायम अशी भीती वाढते की एवढ्या प्रमाणात केस सतत गळत राहिले तर एखाद्या दिवशी टक्कल पडेल. केस एवढ्या जास्त प्रमाणात गळत असतील तर नक्कीच त्याचं एक कारण अपुरं पोषण हे देखील असू शकतं. आपल्या आहारातून केसांना योग्य पोषण मिळालं नाही, तर त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि केस गळणं वाढत जातं (3 Ayurvedic remedies for reducing hair fall). म्हणून आता केस गळणं कमी करण्यासाठी फक्त वरवरचे उपाय (How to reduce hair loss) करण्यापेक्षा आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले हे काही सोपे उपाय करून पाहा. (what to do for intensive hair loss)

केस गळणं कमी करण्यासाठी ३ उपाय

 

हे उपाय इन्स्टाग्रामच्या vaidya_mihir_khatri या पेजवर सुचविण्यात आले आहेत. 

१. आवळ्याचा रस

सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आवळे आले आहेत. दररोज सकाळी आवळ्याचा १० मिली ज्यूस घ्या.

तेलाची किटली खूपच तेलकट- चिकट झाली? २ सोपे उपाय- किटली चटकन होईल स्वच्छ 

त्यात थोडं पाणी आणि थोडी खडीसाखर टाकून प्या. यामुळे केस तर वाढतीलच, पण त्वचाही नितळ होईल. त्वचेवर ग्लो येईल. शिवाय आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.

 

२. दूध आणि तूप

रोज रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास गरम दुधात १ टेबलस्पून तूप टाकून प्यावे. तूप घरी तयार केलेले असावे.

इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायच्या? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत बघा सुंदर पार्टीवेअर हिल्स

हे केल्याने केस गळणं कमी होईल. शिवाय हाडांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळेल. पोट साफ होण्यास, पचनाचे त्रास कमी करण्यास मदत होईल.

 

३. नाकामध्ये २ थेंब तूप 

रोज रात्री झोपण्यापुर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये घरी केलेल्या शुद्ध तुपाचे २- २ थेंब टाका. हा उपाय केल्याने डोक्याच्या त्वचेखाली रक्ताभिसरण क्रिया वेगवान हेाण्यास मदत होते.

जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

यामुळे केसांच्या मुळांना चांगला रक्तपुरवठा होऊन केसांची वाढ होण्यास आणि केस गळती कमी होण्यास मदत होते. श्वसनाचा, कफाचा त्रासही या उपायामुळे कमी होईल. 

 

Web Title: 3 Ayurvedic remedies for reducing hair fall, How to reduce hair loss, what to do for intensive hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.