Join us  

कापूर-कडूनिंब- लिंबू आणि दही, केसांत कोंड्याचे थर असतील तर करा ३ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 2:29 PM

3 Benefits & Best Ways To Use Camphor For Healthy Hair केसात कोंडा झाला की आपण महागडे शाम्पू आणि क्रिम लावतो, त्याहून सोपे उपाय आपल्या घरात आहेत.

'क्या है आपका खूबसूरत बालों का राज' हे वाक्य आता कमीच महिलांना ऐकू येत असतील. कारण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे, अनेकांना केसांची हवी तशी काळजी घ्यायला जमत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे बिघडलेली जीवनशैली, प्रदूषण, केमिकल प्रॉडक्ट्स, या कारणांमुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात. यावर उपाय म्हणून आपण कापुराचा वापर करू शकता. आता तुम्ही म्हणाल कापुराचा वापर फक्त पूजेसाठी होतो. तर असे नाही, याचा वापर स्किन आणि केसांसाठी देखील होतो.

कापूरमध्ये लिनालूल, युजेनॉल, सॅफ्रोल, सिनेओल, ß-मायरसीन, नेरोलिडॉल, कॅम्फेन आणि बोर्निओल इत्यादी घटक आढळतात. जे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे.  केसांची इतर समस्या सोडवण्यासाठी कापुराचा वापर कसा करावा हे पाहूयात(3 Benefits & Best Ways To Use Camphor For Healthy Hair).

कापूर - खोबरेल तेल

कापूरसोबत खोबरेल तेल लावल्याने स्काल्पवरील खाज कमी होते. जर आपल्या स्काल्पवर नेहमी खाज येत असेल, तर, हा उपाय करून पाहा. यासाठी एका वाटीत खोबरेल तेल घ्या, त्यात कापूर पावडर घालून मिक्स करा. हे तेल स्काल्प आणि केसांवर लावा. एक तासानंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे कोंडा कमी होईल, व खाजही येणार नाही.

१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब

कापूर - कडूलिंबाची पानं

जर आपण कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर, कापूर आणि कडूलिंबाच्या पानांचा वापर करून पाहा. कडूलिंबाची पानं स्काल्पवरील खाज आणि कोंडा कमी करू शकतात. यासाठी कडूलिंबाची पानं आणि कापूर घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे स्काल्प साफ होईल.

कापूर - लिंबू

कापूरसोबत लिंबाचा रस वापरल्याने कोंडा दूर होतो. यासाठी कापूरमध्ये लिंबाचा रस मिसळा. व ही पेस्ट स्काल्पवर लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

चेहऱ्यासाठी कच्चे दूध म्हणजे वरदान, २ चमचे दुधात मिसळा ३ गोष्टी, चेहरा करेल ग्लो

कापूर - रीठा - दही

कापूर, रीठा आणि दही केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. रीठा केसांना निरोगी ठेवते, व कापूर अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते. याशिवाय दही लावल्याने स्काल्पवरील येणारी खाज कमी होते. यासाठी रीठा पाण्यात उकळवा, त्यात दही आणि कापूर घालून मिक्स करा. केसांवर लावल्यानंतर ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स