खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसगळतीची (Hair Care Tips) समस्या सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. केस पांढरे होणे, केसात कोंडा, केस पातळ होणे यासह केसांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. केसांची काळजी घेताना आपण तेल आणि विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण केमिकल रसायनयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर न करता आपण मेथी दाणे आणि कांद्याचा वापर करा. मेथी दाणे (Fenugreek) आणि कांद्याचा (Onion Juice) केसांवर केल्याने केस गळतीची समस्या दूर होते.
उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील आयुर्वेदिक डॉक्टर प्रेरणा गुसैन यांनी लोकमत १८ ला सांगितल की, 'केस सतत गळत असतील तर, आणि टक्कल पडण्याची शक्यता जास्त निर्माण होते. अशावेळी केसांना तेलाने मसाज करत राहा. आपण स्काल्पवर मसाज करण्यासाठी मोहरी, बदाम आणि खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासह बदाम किंवा खोबरेल तेलाचा वापर करा. यातील पोषक घटक केसांसाठी फायदेशीर ठरते'(3 Benefits of Fenugreek & Onion Juice for Hair).
मेथी आणि कांद्याचा हेअर मास्क
डॉक्टर प्रेरणा गुसाईन यांच्या मते, 'केसांच्या वाढीसाठी आपण मेथी दाने आणि कांद्याचा हेअर मास्कचा वापर करू शकता. यामुळे केस नैसर्गिकरित्या निरोगी राहील. यासाठी एका बाऊलमध्ये मेथी दाणे घ्या. त्यात पाणी घालून मेथी रात्रभर भिजत ठेवा, आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करा. नंतर त्यात कांद्याचा रस मिसळा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. काही वेळानंतर केस पाण्याने धुवा.
कूकरच्या झाकणाची गॅस्केट सैल झाली? शिट्ट्याच होत नाही? ३ भन्नाट युक्त्या, कूकरचं काम जोरात
केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे
केसांसाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते. मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन - सी हे स्कॅल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट करण्यास मदत करतात. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत करतात.
साउथमध्ये घरोघरी जसं दही खातात, ‘तसं’ खा, बॅड कोलेस्टेरॉल विसरा आणि वजनही होईल कमी
केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे
कांदा फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. शिवाय कांद्याचा रस डोक्यातील रक्ताभिसरणही वाढवते.