प्रत्येक घरात आढळणारा कापुराचा वापर फक्त पूजेसाठी होतो. पण आपल्याला माहित आहे का? कापुराचा वापर आपण चेहऱ्यासाठी देखील करू शकता. अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले कापुर, मुरुम येण्यापासून प्रतिबंधित करते.
कापुर बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या उपचारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासह काळे डाग घालवण्यासाठी देखील वापरले जाते. त्वचेमध्ये दीर्घकाळ थंडावा कापुर निर्माण करते. कापुराच्या वापरण्याचे मार्ग आणि फायदे पाहा(3 Benefits of pooja camphor, very useful for skin).
स्किन व्हाइटनिंग करण्यासाठी मदत
स्किन व्हाइटनिंगसाठी कापुर तेल, मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिक्स करून फेसमास्क तयार करा. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाईल. यासह त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारेल. ज्यामुळे आपला नैसर्गिक रंग उजळेल.
चेहऱ्याला हायड्रेट ठेवायचंय, वापरून पाहा टरबूज फेसपॅक, २ मिनिटात चेहरा होईल तुकतुकीत - करेल ग्लो
खाजेपासून आराम
उन्हाळ्यात खाजेची समस्या अधिकपटीने वाढते. यासाठी कापुर बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. आता हे मिश्रण खाज उठत असलेल्या जागेवर लावा. यातील अँटीफंगल गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करते. यासह त्वचेवरील जळजळ कमी होते.
पिगमेंटेशनची समस्या होईल कमी
कापुराचा वापर आपण पिग्मेंटेशनची समस्या कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी कापुर बारीक करून त्यात चंदन मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर धुवा. यामुळे मृत पेशी निघेल, यासह चेहऱ्यावरील छिद्रे साफ होऊन चेहरा चमकेल.
५ चुकांमुळे कायमची थांबते केसांची वाढ, केस गळतात-विरळ होतात
मृत त्वचा काढून टाकण्यास प्रभावी
डेड स्किन काढण्यासाठी कापुर आणि बेसनचा फेसमास्क लावा. यासाठी अर्धा चमचा कापूर तेल घ्या, त्यात एक चमचा बेसन आणि दोन चमचे गुलाबजल मिसळा व चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. बेसन तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करते. यासह गुलाब पाणी त्वचेचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते.