Join us  

How To Reduce Hair Fall: केस गळणं खूपच वाढलं? फक्त ३ पदार्थ करतात केसांवर जादू, लवकरच केस होतील मजबूत- दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 6:24 PM

Hair Care Tips: हे काही घरगुती उपाय करून बघा.. केसांचं गळणं (hair fall) तर एकदमच कमी होईल, शिवाय केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढही अधिक चांगली होईल.

ठळक मुद्देनाजूक झालेल्या केसांसाठी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्स वापरायलाही भीतीच वाटते. त्यामुळेच तर हे काही घरच्याघरी तयार केलेले हेअरपॅक वापरून पहा.

केस धुतल्यानंतर किंवा मसाज करून गुंता काढल्यानंतर केस कधी कधी एवढे जास्त गळतात (remedies for hair fall) की लवकरच आपल्याला टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागे. काही जणींचे केस एवढे नाजूक झालेले असतात की एखादी वेगळी हेअरस्टाईल करण्याचीही त्यांची हिंमत होत नाही. कारण हेअरस्टाईल केली की पुन्हा केस ओढले- ताणले जाणार आणि लगेच तुटणार. केसांची मुळं एवढी नाजूक झाली असतील, तर काही उपाय (how to control hair fall) करणं गरजेचंच आहे. अशा नाजूक झालेल्या केसांसाठी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्स (home made hair pack for hair growth) वापरायलाही भीतीच वाटते. त्यामुळेच तर हे काही घरच्याघरी तयार केलेले हेअरपॅक वापरून पहा.

 

केस गळणं कमी होण्यासाठी हेअरपॅक१. बीट तब्येतीसाठी जसं बीट खाणं चांगलं असतं, तसंच आपल्या केसांच्या वाढीसाठीही बीट रुट अतिशय उत्तम ठरतं. बीटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे ते केसांना पोषण तर देतंच, पण त्यासोबतच डोक्याच्या त्वचेची देखील काळजी घेतं. बीटरुटचा रस करून तो आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांशी हलक्या हाताने चोळा. साधारण अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढ अधिक चांगली होईल. केसांना मेहंदी लावत असाल, तर मेहंदी भिजवताना त्यात बीटरुट किसून टाका. त्यामुळेही केसांना बीटरुटचं पोषण मिळेल. 

 

२. खोबरेल तेल आणि कढीपत्ताज्या दिवशी केस धुवायचे असतील, त्याच्या आदल्या रात्री अनेक जणी केसांना तेल लावून मालिश करतात. मसाज करण्यासाठी इतर कोणतंही तेल वापरण्यापेक्षा हे होम मेड कढीपत्ता तेल वापरून बघा. यासाठी अर्धी वाटी खोबरेल तेल एका भांड्यात काढा आणि गॅसवर गरम करायला ठेवा. त्याचवेळी त्यात कढीपत्त्याची ८ ते १० पाने बारीक बारीक तुकडे करून टाका. तेल गरम होऊन पानांचा रंग बदलू लागेल. पाने जेव्हा काळी पडतील, तेव्हा गॅस बंद करा. तेल कोमट होऊ द्या. कढीपत्त्याचे कडक झालेली पाने तेलातच राहू द्या, फक्त बोटांनी चुरून टाका. या तेलाने केसांना मसाज करा आणि ५ ते ६ तासांनी केस धुवून टाका. 

 

३. दही आणि मेथ्याएक टेबलस्पून मेथ्या रात्रभर पाण्यात भिजू द्या. दुसऱ्या दिवशी त्या मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात दोन टेबलस्पून दही टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. हा लेप केसांच्या मुळाशी लावा. एखाद्या तासाने केस धुवून टाका. मेथ्या केसांसाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा याप्रमाणे १- २ महिने हा उपाय नियमित केल्यास केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढ नक्कीच अधिक जोमाने होईल.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी