घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून सगळेचजण परफ्युम, डियो वापरतात. परफ्युम, डियो आपण रोजच वापरतो. परफ्युम, डियो वापरण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर आपण याचा वापर करतो. कुणी मनगट, मान, छाती अशा वेगवेगळ्या अवयवांवर परफ्युम, डियो लावणे पसंत करतात. असे असले तरीही बऱ्याचजणांना अंडरआर्म्समध्ये परफ्युम, डियो लावणे अधिक जास्त आवडते. परंतु शरीरावर आणि त्वचेवर कोणत्याही भागात परफ्युम, डियो लावणे योग्य नसते(Body Parts You Should Never Apply Perfume On).
परफ्युम, डियोमधील केमिकल्स व हानिकारक रसायनांचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून शरीराच्या नेमक्या कोणत्या भागांवर परफ्युम, डियो लावावा, याबद्दल माहिती घेऊयात(Avoid spraying perfume on these 3 parts of your body).
परफ्युम, डियो शरीराच्या या भागांवर लावू नका...
१. डोळ्यांजवळ लावणे टाळा :- परफ्युम, डियो शक्यतो डोळ्यांजवळ लावणे टाळा. परफ्युम, डियोमध्ये असणारे केमिकल्स, हानिकारक रसायने डोळ्यांना इजा पोहचवू शकतात. आपल्या डोळ्याभोवतीची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय पातळ असते, अशा परिस्थितीत या नाजूक भागाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. परफ्युम, डियो स्प्रे करताना तो डोळ्यांत उडणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.
म्हणायला कडू पण मेथ्या म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ४ सोप्या पद्धतीने वापरा- केसांसाठी तर अतीगुणकार...
२. अंडरआर्म्स :- आपल्याला सर्वात जास्त घाम हा काखेत येतो. यासाठीच ही घामाची दुर्गंधी लपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण शक्यतो अंडरआर्म्समध्ये परफ्युम, डियो लावतो. बहुतेक सगळेचजण अंडरआर्म्समध्ये परफ्युम, डियो लावतात, परंतु हे चुकीचे आहे. अंडरआर्म्समध्ये परफ्युम, डियो लावणे टाळावे, शक्यतो जेव्हा आपण वॅक्सिंग करतो तेव्हा खासकरुन परफ्युम, डियो लावू नये. अशा परिस्थितीत परफ्यूम लावल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेची जळजळ, पुरळ येणे, त्वचा लाल होणे, काळी पडणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या कपड्यांवर परफ्यूम लावणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
३. कानाजवळ लावू नका :- कानाजवळ परफ्युम, डियो लावणे टाळा. कानाजवळ परफ्यूम लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर केमिकल्स व हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे कानाच्या त्वचेलाइजा होऊन जळजळ होऊ शकते. याव्यतिरिक्त, कानाजळवळच्या त्वचेला परफ्यूम लावल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, कारण हानिकारक रसायने कानाच्या आतील त्वचेला इजा पोहचवू शकतात. त्यामुळे कानाजवळच्या त्वचेला कधीही परफ्यूम लावू नये. जर तुम्हाला कानाजवळ परफ्युम, डियो लावायचा असेल तर तुम्ही कानामागील त्वचेवर परफ्यूम लावू शकता. यामुळे सुगंधही कायम राहतो आणि कोणत्याही प्रकारची हानी होण्याचा धोका नसतो.
परफ्युम, डियो शरीराच्या कोणत्या भागांवर लावावे ?
योग्य ठिकाणी परफ्यूम लावा मनगट, मान आणि छाती यांसारख्या भागांवर परफ्यूम लावण्याची खात्री करा. ही अशी ठिकाणे आहेत जिथे तुमच्या त्वचेतून उष्णता निघून जाते. अशात शरीराच्या या अवयवांजवळ परफ्युम लावल्यास सुगंध पसरण्यास मदत होते. केसांमधले परफ्यूम म्हणजे तेल जे परफ्यूमप्रमाणे तासन् तास सुगंधित राहतात. त्याचा सुगंध दिवसभर तुमच्या केसांमध्ये राहील आणि उन्हाळ्यात शरीरातील घामाच्या वासापासून मुक्त होण्यास मदत होईल.