ऋतू बदलला की आपल्या आहारात, कपडे घालण्याच्या पद्धतीत अनेक बदल होत जातात. कारण शरीर निरोगी ठेवण्यासाठी असे काही बदल करणं गरजेचंच असतं. अशाच बदलांची गरज आपल्या त्वचेलाही असते. कारण प्रत्येक ऋतूमधील वातावरणाचा वेगवेगळा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये एकाच पद्धतीचं स्किन केअर रुटीन असू शकत नाही. तसं केल्यास त्वचेमध्ये काही बदल जाणवू लागतात (3 Changes in your skin). पण ते बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणूनच पुढील काही प्रकारचे बदल तुमच्या त्वचेमध्ये दिसायला लागले तर तुमचं स्किन केअर रुटीन बदलण्याची (need to change your skin care routine) आता गरज आहे, असं समजावं.
त्वचेमध्ये दिसून येणारे बदल
१. त्वचा लालसर दिसणे
त्वचा जर लालसर दिसत असेल किंवा सावळा वर्ण असल्यास त्वचेवर बारीक पुरळं असल्याप्रमाणे दिसत असेल तर तुमच्या स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये सल्फेट असण्याची शक्यता आहे.
केस गळणं थांबविण्यासाठी रामदेव बाबा सांगतात २ खास उपाय, केस वाढतील भराभर- राहतील काळेभोर
आजकाल काही फेसवॉश आणि मॉईश्चरायझरमध्येही Sodium Lauryl Sulphate असतं. त्यामुळे त्वचा एकतर लालसर किंवा बारीक पुरळं आल्याप्रमाणे दिसते. त्यामुळे असे प्रोडक्ट्स बदलण्याची गरज आहे.
२. त्वचा ऑईली होणे
बऱ्याचदा ज्यांची त्वचा ड्राय असते, त्यांची त्वचा ऑईली झाल्याचे जाणवते. किंवा ज्यांची त्वचा आधीपासूनच ऑईली असते, त्यांची त्वचा आणखीनच ऑईली दिसू लागते. याचा अर्थ असा की तुमच्या त्वचेचं डिहायड्रेशन होत आहे.
घ्या स्वत:ची परीक्षा आणि बघा तुमच्या शरीराचं नेमकं वय किती.. करून तर पाहा
जेव्हा त्वचा डिहायड्रेट होऊ लागते तेव्हा त्वचेतील ग्रंथी अधिक प्रमाणात तेल स्त्रवतात आणि त्वचेला मॉईश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्या बाबतीत असं झालं तर त्वचेचं डिहायड्रेशन होत आहे, हे समजावं.
३. ॲक्ने आणि पिंपल्स
त्वचेची, हातांची किंवा कपड्यांची योग्य स्वच्छता राखण्यास आपण कमी पडलो तर असा त्रास उद्भवू शकतो.
हिवाळ्यातले सुपरफूड: वाढत्या थंडीत आजारपण टाळून फिट रहायचंय ना? मग ५ पदार्थ न चुकता खा
त्यामुळे हात स्वच्छ ठेवा. चेहरा दिवसातून ३ ते ४ वेळा नुसत्या पाण्याने धुवा आणि चेहऱ्यासाठी वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकिन एक- दोन दिवसाआड धुवून टाका.