केसांसाठी खोबरेल तेल (Coconut Oil) म्हणजे वरदान. खोबरेल तेलामुळे केसांची (Hair Care) योग्य वाढ होते. खोबरेल तेलाचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलो आहे. भारतीयांसाठी खोबरेल तेलाचे विशेष महत्व आहे. खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि चांगले पोषण होण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे. केसांतला कोंडा, रुक्षपणा, खाज, केस पांढरे होणे यासह इतर समस्या खोबरेल तेलामुळे दूर होतात. खोबरेल तेलाचे केसांसाठी होणारे फायदे भरपूर आहेत.
खोबरेल तेलामध्ये असणारे फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी फायदेशीर ठरते. जर केसांना खोबरेल तेलातील अधिक पोषण मिळावे असे वाटत असेल तर, त्यात ३ घरगुती गोष्टी मिसळा. या ३ घरगुती गोष्टींमुळे खोबरेल तेलातील पोषण मिळेल आणि केसांची योग्य वाढ होईल(3 Coconut Oil Uses That Benefit Your Hair ).
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
कांद्याचा रस आणि खोबरेल तेल
कांद्यामध्ये असलेले सल्फर आणि अँटी-ऑक्सिडंट केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. हे केसांना मुळापासून पोषण देते ज्यामुळे केस गळणे कमी होते. एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात २ चमचे कांद्याचा रस घाला. भांडं गॅसवर ठेवा. तेल कोमट झाल्यानंतर बंद करा. तयार तेल बाटलीमध्ये भरून ठेवा. कांद्याचे तेल केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावून मसाज करा. तासाभरानंतर केस धुवून घ्या.
जास्वंदाच्या रोपाला कळ्याच कळ्या, फक्त ३ गोष्टींचा करा 'असा' उपयोग; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड
कडीपत्ता आणि खोबरेल तेल
कडीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. कडीपत्ता प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडेंट्सने समृद्ध आहे. ज्यामुळे केस अकाली पांढरे होणे आणि केसांच्या वाढीस मदत होते. यासाठी खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडीपत्ता घाला. पानं त्यात शिजल्यानंतर गॅस बंद करा. तेल कोमट झाल्यानंतर केसांना लावा. नंतर केस शाम्पूने धुवा.
आवळा आणि खोबरेल तेल
आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. त्याच वेळी, खोबरेल तेल फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के प्रदान करते. ज्याचा फायदा केसांना होतोच. यासाठी खोबरेल तेल भांड्यात गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात आवळा घाला. तेल कोमट झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल केसांना लावा. तासाभरानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. या घरगुती तेलामुळे केसांची वाढ सुधारते, केस मजबूत होतात आणि केस गळणे थांबते.