Lokmat Sakhi >Beauty > नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मध - लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; चेहरा होईल क्लिअर

नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मध - लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; चेहरा होईल क्लिअर

3 DIY Home Remedies For Blackheads : मुळापासून ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ३ घरगुती उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 04:50 PM2024-09-20T16:50:28+5:302024-09-20T16:51:15+5:30

3 DIY Home Remedies For Blackheads : मुळापासून ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ३ घरगुती उपाय करून पाहा..

3 DIY Home Remedies For Blackheads | नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मध - लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; चेहरा होईल क्लिअर

नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मध - लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; चेहरा होईल क्लिअर

अनेकदा चेहरा सुंदर असला तरीही नाकावरच्या ब्लॅकहेड्समुळे (Blackheads) चेहऱ्याची शोभा कमी होते. बऱ्याचदा संपूर्ण चेहरा स्वच्छ असतो. पण नाक मात्र, तेलकट आणि ब्लॅकहेड्सने भरलेले असते (Skin care Tips). अशावेळी चारचौघात लाजिरवाणे तर वाटतेच, पण आपणही बाहेर जाणं टाळतो. ब्लॅकहेड्स काढण्यसाठी आपण सरळ ब्यूटी पार्लर गाठतो. पण ब्यूटी पार्लरमध्ये खर्च करण्यापेक्षा आपण घरातच ब्लॅकहेड्स काढू शकता(3 DIY Home Remedies For Blackheads).

नाकावर ब्लॅकहेड्स कशामुळे येतात?

चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचते. यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. हेच ब्लॅकहेड्स, जे बहुतेक नाकावर अथवा नाकाच्या बाजूला असतात. जे सहसा चेहरा धुवूनही निघत नाही. यासाठी काही केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपायांनीही आपण ब्लॅकहेड्स काढू शकता.

चांदीच्या जोडव्यांची पाहा ७ ट्रेण्डी - नाजूक डिझाईन; नजरा पायांवरच खिळतील

दालचिनी

दालचिनीमध्ये आढळणारे सर्व घटक नाकावर साचलेले काळे डाग दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी एका बाऊलमध्ये दालचिनी पावडर, एक चमचा लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा.  तयार पेस्ट नाकावर लावा. १५ मिनिटानंतर चोळून पेस्ट काढा. यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतील.

टोमॅटो

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आपण टोमॅटोचाही वापर करू शकता. यासाठी टोमॅटो मॅश करा आणि पेस्ट तयार करा. आता मॅश केलेल्या टोमॅटोमध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला आणि तयार पेस्ट नाकावर लावा. नाकावर ही पेस्ट २० मिनिटांसाठी ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

मध - लिंबू

नाकावर साचलेले काळे डाग मध आणि लिंबाच्या मदतीनेही काढता येतात. एका बाऊलमध्ये मध  आणि लिंबाचा रस घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट नाकावर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा. ब्लॅकहेड्स होतील गायब.

Web Title: 3 DIY Home Remedies For Blackheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.