उन्हाळा सुरु झाल्यानंतर त्वचा खूप चिपचिपित होते. अंगातून प्रचंड घाम निघतो. ज्यामुळे शरीरातून दुर्गंधी तर येतेच, यासह त्वचेच्या संबंधित समस्या देखील वाढतात. धूळ, माती, प्रदूषण या गोष्टींमुळे त्वचा आणखी खराब दिसते. मुख्य म्हणजे सूर्य किरणांमुळे टॅनिंगची समस्या वाढते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
यासाठी आपण कुलिंग फेस पॅकचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता. कूलिंग फेस पॅकचे काम त्वचेला थंडावा व चमक देणे आहे. हे ३ कूलिंग फेस पॅक आपण घरगुती साहित्यांचा वापर करून तयार करू शकता. यात एलोवेरा फेस पॅक, मुलतानी माती फेस पॅक, काकडीचा फेस पॅक यांचा समावेश आहे(3 DIY Summer Face Packs To Try RN).
काकडीचा फेस पॅक
काकडीमध्ये भरपूर पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असते. ज्यामुळे शरीरासह त्वचेला देखील फायदा होतो. हा फेस पॅक करण्यासाठी सर्वप्रथम, एका वाटीत काकडी किसून घ्या, त्यात एक चमचा दही मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. व १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. या उपायामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतील. यासह त्वचेला आर्द्रताही मिळेल.
कांद्याची टरफलं कचरा म्हणून फेकू नका, ५ मिनिटांत करा झटपट हेअर डाय! केस काळेभोर होतील
एलोवेरा फेस पॅक
एलोवेरा अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असते. चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने, त्वचेला संरक्षणात्मक थर मिळण्यास मदत होते. यासाठी एका वाटीत ४ चमचे एलोवेरा जेल घ्या, त्यात एक चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
मुलतानी मातीचा फेस पॅक
मुलतानी माती ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकेटने समृद्ध आहे. जी तेलकट आणि मुरुमांच्या समस्येवर खूप फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत २ चमचे मुलतानी माती, गुलाब जल, व चिमुटभर हळद घेऊन मिश्रण मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा फेस पॅक आपण महिन्यातून ३ वेळा वापरू शकता.