Join us  

पावसाळ्यात केसांना येतो घाणेरडा वास; केस सुगंधी करण्याचे 3 सोपे घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 2:23 PM

केसांना निरनिराळ्या कारणाने घाणेरडा (bad smell to hair) वास येतो. शाम्पू कंडिशनरच्या उपयोगानं हा दुर्गंध तात्पुरता जातो. पण जे काम ब्रॅण्डेड हेअर प्रोडक्टसने होत नाही ते घरच्याघरी केलेल्या (home remedy for removing bad smell from hair) उपायांनी सहज होतं.

ठळक मुद्देपावसाळ्यात ओलसर आणि दमट वातावरणामुळे टाळूची त्वचा जास्त तेलकट होते.विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी घरी तयार केलेला शिकेकाईचा शाम्पू वापरावा. टी ट्री ऑइल आणि लिंबाचा रस यांचा उपाय करुनही केसातला दुर्गंध घालवता येतो. 

ऋतुनुसार केसांची काळजी घ्यावी लागते. बदलत्या हवामानाचा परिणाम केसांवर होतो. हवामानानुसार केसांची काळजी घेण्यास हयगय केल्यास केस रुक्ष, निस्तेज होतात. केस गळतात, पातळ होतात.  पावसाळ्यात ओलसर आणि दमट वातावरणामुळे (hair problems in monsoon)  टाळूची त्वचा जास्त तेलकट होते, त्याचा परिणाम म्हणजे केसांचा घाणेरडा वास (bad smell to hair)  येतो. हा वास शाम्पू कंडिशनरचा वापर केल्यानं तात्पुरता जात असला तरी एक दोन दिवसातच ही समस्या पुन्हा उद्भवते. केसांमधील दुर्गंधी जावून केस छान सुगंधी होण्यासाठी घरच्या घरी (home remedy for removing bad smell from hair)  सोपे पण प्रभावी उपाय करता येतात. 

Image: Google

केसांना दुर्गंधी का येते?

केसांभोवती सतत स्कार्फ गुंडाळाल्यानं, डोक्यात सतत टोपी घातल्यानं केसातला घाम लवकर सुकत नाही. त्यातून केसांच्या मुळांशी जास्त तेलाची निर्मिती होवून केस चिपकू होवून केसांना दुर्गंध येतो. तसेच आहारात कांदा, लसूण, मसाल्यांचा अती वापर केलेले पदार्थ खाल्ल्यास  केसांना वास येतो. तसेच वातावरणातल्या प्रदूषणामुळे केसांच्या मुळाशी जास्त घाण जमा होते. टाळूशी तयार होणाऱ्या तेलामुळे ही घाण टाळुच्या त्वचेला चिटकून बसते. अशा परिस्थितीत केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास  केसांना दुर्गंधी येते. 

Image: Google

केस सुगंधी होण्यासाठी

केस सुंगधी होण्यासाठी  घरच्याघरी सोपे उपाय करता येतात. 

 शिकेकाई शाम्पू

केसातील दुर्गंध जाण्यासाठी बाजारात मिळणारे शाम्पू न वापरता घरी तयार केलेला शिकेकाईचा शाम्पू वापरावा. कारण बाजारातल्या शाम्पूमध्ये केस आणि टाळुच्या त्वचेला हानी पोहोचवणारे घटक असतात. हे टाळण्यासाठी शिकेकाई शाम्पूचा चांगला उपयोग होतो. शिकेकाई शाम्पूमुळे टाळुची त्वचा स्वच्छ राहाते. शिकेकाईतील बुरशीरोधक गुणांमुळे केसात कोंडा होत नाही. शिकेकाईच्या शाम्पूनं टाळुच्या त्वचेचा पीएच स्तर राखला जातो.  टाळुच्या त्वचेची होणारी जळजळ थांबते. घरच्याघरी शिकेकाई शाम्पू तयार करण्यासाठी शिकेकाई, रीठे, सुका आवळा, कढी पत्ता आणि जास्वंदीची फुलं एका भांड्यात पाणी घेऊन त्यात रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे सर्व घटक उकळून घ्यावेत. ही सामग्री उकळून घेतल्यानंतर थोडी थंड होवू द्यावी. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी.  हे मिश्रण शाम्पू प्रमाणे केसांना लावावं. केसांच्या मुळांशी आणि संपूर्ण केसांना हे मिश्रण हलक्या हातानं मसाज करत लावावं. 3 ते 4 मिनिटं मसाज केल्यानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

Image: Google

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलचा वापर करुन केसांचा दुर्गंध घालवता येतो. कारण टी ट्री ऑइलमध्ये प्रभावी क्लिनिंग घटक, जिवाणु आणि अति सूक्ष्मजिवाणुविरोधी घटक असतात. हे घटक केसांचा दुर्गंध घालवण्याचं काम करतात.  शाम्पू करण्यापूर्वी खोबरेल तेलात थोडं  टी ट्री ऑइल घालून केसांच्या मुळाशी मसाज केल्यास केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह सुधारतो. टी ट्री ऑइल मसाजमुळे केसात कोंडा होत नाही. संसर्गाचा धोका टळतो. टाळुची त्वचा पर्यायानं केस निरोगी राहाण्यास मदत होते.

Image: Google

 लिंबाचा रस

 लिंबाच्या रसात  किटाणुंशी लढण्याची क्षमता असते. लिंबाच्या रसाचा उपयोग करुन टाळुच्या त्वचेवर दुर्गंध निर्माण करणाऱ्या जिवाणुंचा नायनाट करतात. लिंबाच्या रसाअत आम्ल गुणधर्म असल्यानं टाळुच्या त्वचेचा पीएच स्तर नियंत्रित राखला जातो. यामुळे केसांना दुर्गंध येत नाही. लिंबामध्ये क जीवनसत्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲण्टिऑक्सिडण्टस, फ्लेवोनाॅइड्फ हे गुणधर्म असल्यानं केस मजबूत होतात. डोक्यात कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीस प्रतिरोध होतो. टाळुच्या त्वचेला होणारा संसर्ग लिंबाच्या रसाद्वारे रोखला जातो. यामुळे केस सुगंधी होण्यासोबतच निरोगीही होतात. खोबरेल तेलात थोडं लिंबू पिळून या मिश्रणानं केसांच्या मुळांशी मसाज करावा. तसेच संपूर्ण केसांनाही हे तेल लावावं.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहोम रेमेडीमानसून स्पेशल