Join us  

डबल चिनमुळे चेहरा खूप जाडजूड दिसतो? रोज स्वत:ला द्या फक्त ५ मिनिटं, हनुवटी दिसेल निमूळती शार्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 2:15 PM

3 Easy Yoga Poses for Double Chin Problem : डबल चीन घालवायची कशी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी सोपे व्यायाम...

आपण बारीक असावे, आपली मान बाकदार असावी असं प्रत्येकीला वाटतं. वजन कमी असेल तरी अनेकदा डबल चिन असल्याने म्हणजेच हनुवटीखालचा भाग जाड असल्याने आपण जाड दिसतो. हनुवटीखाली वाढलेली चरबी आपल्या चेहऱ्याचा शेप बिघडवते आणि आपण विनाकारण वय वाढल्यासारखे किंवा बेढब दिसतो. आपला चेहरा छान शेपमध्ये असेल तर आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडते. आपली जॉ लाइन परफेक्ट दिसल्याने आपल्या लूक्समध्ये फरक पडतो. पण आता ही वाढलेली डबल चीन घालवायची कशी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आज आपण काही सोपे व्यायामप्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम नियमित केल्यास डबल चीन कमी होण्यास मदत होईल आणि मान मस्त बाकदार दिसण्यास मदत होईल, पाहूयात हे व्यायाम कोणते (3 Easy Yoga Poses for Double Chin Problem)...

(Image : Google)

१. अंगठ्याने वरच्या बाजूला मसाज करणे

अंगठ्याने जॉ लाईनला वरच्या बाजूने मसाज करणे. यामुळे हनुवटीच्या स्नायूंची हालचाल होते आणि त्याठिकाणची चरबी कमी होण्यास याचा चांगला फायदा होतो. मान आणि हनुवटीला अशाप्रकारे मसाज करणे ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असते. 

२. हळूवारपणे जॉ लाईन प्रेस करणे

हनुवटीच्या कडेचे हाड असते त्याठिकाणी अंगठ्याने प्रेस केल्यास ही वाढलेली हनुवटी कमी होण्यास मदत होते. कानापासून ते तोंडाच्या खालपर्यंत असलेले हाड हळूवारपणे दाबावे त्यामुळे मान बाकदार आणि छान दिसण्यास मदत होते.

 ३. फिश पोझमध्ये मानेची हालचाल 

फिश पोझ म्हणजे ओठ आतल्या बाजूला ओढून घेऊन माशाप्रमाणे चेहरा करणे. असे करुन चेहरा एकदा वर आणि एकदा खाली न्यावा. यामुळेही चेहऱ्याची आणि मानेची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. हे सगळे व्यायाम करायला अगदीच कमी वेळ लागतो. तसेच जाता येताही हे व्यायामप्रकार करता येतात. त्यामुळे नियमितपणे हे सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफिटनेस टिप्सव्यायाम