Join us  

केस कमजोर झाले-खूप गळतात? योगाचार्य हंसाजी  योगेंद्र करतात १ उपाय, झुपकेदार होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 2:03 PM

3 Effective Exercise To Ger Strong Hair :

आपले केस मजबूत व्हावेत यासाठी प्रत्येकजण काहीना काही प्रयत्न करत असतो काहीजण मेहेंदी लावतात तर काहीजण हेअर कलर करतात. इतकं सगळं केल्यानंतर केस गळणं, केस पातळ होणं केस कमकुवत होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. शरीराल फिट ठेवण्यासाठी आपण नियमित व्यायाम करतो. ज्यामुळे केस मजबूत राहतात आणि स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. (3 Effective Exercise To Ger Strong Hair Suggested By Doctor Yogendra)

योगाचार्य हंसाजी योगेंद्र (Hansaji Yogendra)यांनी केसांशी निगडीत 3 व्यायाम सांगितले आहेत जे केल्यानं केसांची गुणवत्ता चांगली होण्यास मदत होईल आणि केस उलट्या बाजूनं विंचरणं सोपं होईल. योगाचार्यांनी केस मजबूत बनवण्यासाठी 3 परिणामकारक योगा प्रकार सांगितले आहेत. 

डर्मालाईफच्या रिपोर्टनुसार सर्वांगासन, उत्तनासन, वज्रासन, कपालभाती प्राणायम हे योगा प्रकार केल्यानं केस दाट आणि लांब होण्यास मदत होते.  केसांसाठी व्हिटामीन्स, मिनरल्स  आणि प्रोटीन्स  गरजेचे असतात. रेग्युल हेड मसाज केल्यास केसांची वाढ भराभर होते (Ref). ज्यामुळे  हेअर फॉलिकल्स मजबूत होतात, जास्तीत  जास्त पाणी प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. शरीर रिलॅक्स होण्यास मदत होईल आणि डिप ब्रिथ व्यायाम करा. 

ज्याप्रकारे व्यायाम न केल्यानं आपलं शरीर जखडते. त्याचप्रमाणे जर आपण हेअर एक्सरसाईज केले तर नाही स्काल्पचे पोर्स ओपन होत नाहीत. योगा केल्यानं केसांमध्ये ऑक्सिजन वाढतं आणि नॅच्युरल ऑईल उत्पादन होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि झोप येते. ताण-तणाव कमी होतो पोषण मिळते.

योगाचार्यांनी सांगितलेला व्यायाम कोणता

योग गुरू हंसा यांनी सांगितले की एक व्यायाम केल्यानं केसांची वाढ चांगली होईल. एक कंगवा घ्या नंतर खालच्या बाजूनं केस वर घ्या. नंतर २ ते ३ मिनिटं केस विचरा ज्याला बॅक कोम्बीग असंही म्हणतात. ज्यामुळे केसांची मुळं खेचली जातात आणि केसांना बळकटी मिळते. 

पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

हेअर पुलिंग

केस मजबूत होण्यासाठी हेअर पुलिंग फायदेशीर ठरते. योगाचार्य हंसाची यांनी हेअर पुलिंग व्यायामाबद्दल सांगितले आहे. आपली बोटांनी केसांच्या बटाटा हळूहळू खेचून हलवाल्यात. केसांसाठी हा महत्वाचा व्यायाम आहे.

सर्वांगासन

केसांच्या वाढीसाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी सर्वांगासन फायदेशीर ठरते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि शरीर रिलॅक्स ठेवण्यास मदत होते. यामुळे केसांमध्ये रक्त परिसंचयण वाढते आणि केसांना मजबूत मिळते. हे योगासन तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स