Lokmat Sakhi >Beauty > कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या आल्या? ‘हा’ पदार्थ तेलात कालवून लावा, कायम तरुण दिसा

कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या आल्या? ‘हा’ पदार्थ तेलात कालवून लावा, कायम तरुण दिसा

3 Effective Home Remedies To Get Wrinkle Free Skin : तुम्ही  नारळाच्या तेलानं चेहऱ्याची मसाज करू शकता. यासाठी हातात २ ते ३ थेंब नारळाचं तेल घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:01 PM2023-07-10T14:01:19+5:302023-07-10T14:16:15+5:30

3 Effective Home Remedies To Get Wrinkle Free Skin : तुम्ही  नारळाच्या तेलानं चेहऱ्याची मसाज करू शकता. यासाठी हातात २ ते ३ थेंब नारळाचं तेल घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा.

3 Effective Home Remedies To Get Wrinkle Free Skin : How to use coconut oil to tighten skin | कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या आल्या? ‘हा’ पदार्थ तेलात कालवून लावा, कायम तरुण दिसा

कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या आल्या? ‘हा’ पदार्थ तेलात कालवून लावा, कायम तरुण दिसा

आपण रोज जे काही खातो त्याचा शरीराप्रमाणेच त्वचेवरही परिणाम दिसून येतो. कमी वयात डोळ्यांवर रिंकल्स आणि वय वाढच्या खुणा दिसतात. ज्यामुळे चेहरा डल दिसतो. (Anti-Ageing tips) जसजसं वय वाढत जातं तसतसं कोलोजेन लेव्हलसुद्धा कमी होऊ लागते, इलास्टिन कमी होते. प्रदूषण,स्ट्रेस आणि फ्री रेडिकल्स आपल्या त्वचेतील मॉईश्चर आणि प्रोटीन्स कमी करतात. म्हणूनच त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. (3 Effective Home Remedies To Get Wrinkle Free Skin)

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी बाजारात बऱ्याच क्रिम्स उपलब्ध आहेत पण अनेकदा ही केमिकल्सयुक्त उत्पादनं तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकतात. म्हणूनच लोक होम रिमेडीज आणि केमिकल्सयुक्त उत्पादनं जास्तीत जास्त वापरतात. त्वचेवर एजिंग साईन्स असतील तर सुरकुत्यांपासून बचावसाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाच्या तेलाचा वापर पूर्वापार त्वचेवर केला जात आहे.  या तेलानं त्वचेला पोषण मिळते आणि वय वाढीच्या खुणांनाही लांब ठेवता येते. (How to use coconut oil to tighten skin)

मसाज

तुम्ही नारळाच्या तेलानं चेहऱ्याची मसाज करू शकता. यासाठी हातात २ ते ३ थेंब  नारळाचं तेल घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि सुरकुत्या, फाईन लाईन्स, डाग घालवण्यास मदत होते.

नारळाचे तेल आणि एलोवेरा

एक चमचा नारळाच्या तेलात ताजं एलोवेरा जेल २ चमचे मिसळून एक पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. या उपायानं त्वचा टाईट राहण्यास मदत होईल. याशिवाय फाईन लाईन्स आणि सुरकुत्याही कमी होतील.

नारळाचं तेल मध आणि साखर

नारळाचं तेल, मध आणि साखर याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला स्क्रबप्रमाणे लावा. यामुळे त्वचा सॉफ्ट राहण्यास मदत होईल. त्वचेचा डलनेस निघून मृतपेशीसुदधा कमी होतील. 

Web Title: 3 Effective Home Remedies To Get Wrinkle Free Skin : How to use coconut oil to tighten skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.