Join us  

ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतो, ब्लॅकहेड्स वाढलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ-चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 5:54 PM

3 Effective Homemade Face Packs To Treat Open Pores ओपन पोर्समुळे चेहरा डल दिसत असेल, ब्लॅक हेड्स कमीच होत नसतील तर हे उपाय करुन पाहा

धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वतःकडे लक्ष देणं जमत नाही. खासकरून त्वचेकडे लक्ष द्यायला जमत नाही. जस जसं वय वाढत जातं, तस तसं त्वचेच्या निगडीत अनेक समस्या उद्भवतात. त्यातील एक समस्या म्हणजे ओपन पोर्स. त्वचेची छिद्रे मृत पेशींमुळे तयार होतात. त्यात प्रदूषण, घाण, चेहऱ्यावरील तेल जमा होते. जेव्हा या गोष्टी पोर्समध्ये अडकतात, तेव्हा चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि पुरळ निर्माण होतात. या पोर्सकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

ओपन पोर्स साफ करण्यासाठी या ३ नैसर्गिक पदार्थांचा वापर करा. या फेसमास्कमुळे ओपन पोर्समधून घाण निघून जाईल. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल(3 Effective Homemade Face Packs To Treat Open Pores).

बेकिंग सोडा - मुलतानी माती मास्क

बेकिंग सोडा - मुलतानी मातीचा मास्क त्वचेची छिद्रे साफ करण्यास मदत करतील. हा मास्क त्वचेच्या आत ऑक्सिडाइज करतात. ज्यामुळे ओपन पोर्स निघून, चेहरा स्वच्छ होतो. यासाठी एका वाटीत मुलतानी माती घ्या, त्यात बेकिंग सोडा घालून पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

कोरफड आणि हळदचा फेसमास्क

कोरफड आणि हळद दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने, त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण निघून जाते. यासह त्वचेतील तेल शोषून घेते. यासाठी एका वाटीत २ चमचे हळद घ्या, त्यात कोरफड मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

कोपर - गुडघे काळेकुट्ट झालेत, टॅनिंग जातच नाही? संत्र्याची साल करेल जादू, पाहा कशी वापरायची..

टोमॅटो - दही मास्क

टोमॅटो आणि दह्यापासून बनवलेला हा मास्क, त्वचेला क्लिन करतो. टोमॅटो त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन घाण शोषून घेते. ज्यामुळे पिगमेंटेशनची समस्या कमी होते. यासाठी एका वाटीत टोमॅटोचा रस आणि दही मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी