वयानुसार शरीरात अनेक बदल घडतात. तसेच चेहऱ्यावर देखील बदल दिसून येतात. पिंपल्स, मुरुमांचे डाग यामुळे चेहरा खराब दिसतो. यासह चेहऱ्यावर देखील लहान केस येतात. हे लहान केस संपूर्ण चेहरा किंवा ओठांवर जास्त दिसून येतात. या केसांची वाढ जलद गतीने होते. हे केस काढणे देखील वेदनादायी ठरतात.
चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंग किंवा रेझरचा वापर करतो. वॅक्सिंग करताना चेहऱ्यावर खूप वेदना होतात. चेहऱ्यावरील नको असलेले केस वेदनारहित काढायचे असतील तर, बेसन फेस पॅकचा वापर करून पाहा. या नैसर्गिक फेस पॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस सहज निघून जातील(3 face packs to remove facial hair naturally at home).
बेसन पपई फेस पॅक
चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो देण्याचं काम पपई करते. बेसन - पपई फेस पॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस निघून जातील. यासाठी एका वाटीत २ चमचे पपईची पेस्ट, अर्धा चमचा हळद, १ चमचा एलोवेरा जेल घेऊन मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर हाताने स्क्रब करा. व नंतर पाण्याने चेहरा धुवा.
३ गोष्टी खाणं पिणं बंद करा, केस गळतीचा प्रश्न कायमचा सुटेल- केस होतील दाट काळेभोर
बेसन मसूर डाळ फेस पॅक
मसूर डाळ त्वचा व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बेसनामध्ये मसूर डाळ मिक्स करून लावल्यास चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. यासाठी एका वाटीत मसूर डाळ पावडर, लिंबाचा रस आणि बेसन मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. व २० मिनिटानंतर पेस्ट हाताने काढून, चेहरा पाण्याने धुवा.
१ चमचा कॉफी आणि अर्धा बटाटा, करून पाहा खास फेसपॅक - उन्हाने आलेले टॅनिंग - सुरकुत्या गायब
बेसन मोहरी फेस पॅक
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी मोहरी फेस पॅक लावा. त्यात आपण साखर देखील मिक्स करू शकता. चेहरा स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जातील. यासाठी एका वाटीत बेसन, साखर व मोहरीचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. व काही वेळानंतर स्क्रब करून पेस्ट काढा, नंतर चेहरा पाण्याने धुवा.