बॉलीवूड अभिनेत्रींचं सौंदर्य हा त्या वापरत असलेल्या महागड्या ब्यूटी प्रोडक्ट्सचा किंवा मग त्या स्वत:वर करून घेत असलेल्या महागड्या ट्रिटमेंट्सचाही एक परिणाम असतोच. पण तरीही त्यामागे त्यांची मेहनत सुद्धा असतेच. स्वत:च्या फिटनेसकडे, आहाराकडे, व्यायामाकडे त्यांचे काटेकोर लक्ष असते. त्यामध्ये त्या अजिबातच हयगय करत नाहीत. त्यामुळेच तर वय वाढलं तरी त्यांचं सौंदर्य कमी होत नाही. उलट काही जणींच्या बाबतीत तर असंही होतं की वाढत्या वयासोबत त्या जास्तच सुंदर आणि तरुण दिसू लागतात. असंच काहीसं आहे अभिनेत्री सोहा अली खानचं. सोहा सध्या बॉलीवूडपासून दूर असली तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. सोहाकडे पाहून तिचं वय ४६ वर्षांचं असेल असं कोणालाही वाटत नाही. हे तिने नेमकं कसं जमवलं आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती काय करते ते आता पाहूया..(Fitness Tips And Beauty Tips Shared By Soha Ali Khan)
सौंदर्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी सोहा अली खानच्या खास टिप्स
एचटी लाईफस्टाईल यांनी सोहा अली खानची नुकतीच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये तिने तिचे खाली सांगितलेले काही ब्यूटी सिक्रेट्स शेअर केले आहेत.
१. आहार
सोहा म्हणते की सौंदर्य हे तुमच्या आतून यायला हवं यावर माझा पुर्ण विश्वास आहे. वरवरच्या गोष्टी करून तुमचा फिटनेस आणि सौंदर्य टिकत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीचा संतुलित आहार घेण्यावर माझा भर असतो. त्यामुळेच त्वचा चांगली राहाते. त्यामुळे हंगामी फळं आणि हिरव्या पालेभाज्या तिच्या आहारात जास्तीतजास्त प्रमाणात असतात.
२. बदाम
सोहाचा बदाम खाण्यावर खूप भर आहे. ती म्हणते की प्रोटीन्स, व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स यासोबतच बदामामध्ये इतर १५ पौष्टिक घटक असतात जे त्वचेसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
कणकेमध्ये 'हा' पांढरा पदार्थ मिसळून करा पोळ्या, १ महिन्यात सुटलेलं पोट उतरून वजन घटेल
शिवाय बदामामध्ये असणारे ॲण्टीएजिंग गुणधर्म तुमचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दररोज सकाळी ती मुठभर तरी बदाम खातेच.
३. व्यायाम
केवळ आहारावर भर देऊन तुमचं सौंदर्य आणि फिटनेस टिकून राहू शकत नाही. त्याला व्यायामाची जोड द्यावीच लागते. सोहा नेहमीच नियमितपणे व्यायाम करते आणि त्याविषयीचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांनाही त्याविषयी जागरुक करत असते.