Join us  

पावसाळ्यात केस जास्तच गळू लागलेत? तज्ज्ञ सांगतात ३ पदार्थ, केसांच्या मजबुतीसाठी नियमित खा आणि वापरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 12:51 PM

Home Remedies For Long And Strong Hair: पावसाळ्यात हेअरफाॅल होण्याची समस्या जरा जास्तच वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी या दिवसांत कोणते पदार्थ आवर्जून खावेत आणि वापरावेत, याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी शेअर केली आहे.

ठळक मुद्देया समस्येवर केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आहारातून योग्य उपाय केल्यास कधीही अधिक उत्तम.

पावसाळ्यात बऱ्याचदा आपण पावसात भिजतो, केस अर्धवट ओले राहतात, त्यामुळे डोक्यात इन्फेक्शन होऊन केसांतला कोंडा आणि केसगळती (hair fall in monsoon) या समस्या वाढतात. एरवीही ज्यांचे केस कायमच गळतात, त्यांचा हा त्रास तर पावसाळ्यात खूप जास्त वाढलेला असतो. या समस्येवर केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आहारातून योग्य उपाय केल्यास कधीही अधिक उत्तम. म्हणूनच याविषयीची एक पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली असून केसगळती (Home Remedies For Long And Strong Hair) कमी करण्यासाठी कोणकोणते खाद्यपदार्थ (food items that can reduce hair fall) खावेत, याची माहिती दिली आहे.

 

केसगळती थांबविण्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ१. मेथ्या (Methi Dana)कढी, वरण या पदार्थांत तसेच फोडणी देताना मेथ्यांचे दाणे आवर्जून टाका. त्यामुळे ते पाेटात जातील. तसेच खोबरेल तेल गरम करा, त्यात थोडे मेथी दाणे टाका. हे तेल कोमट झाल्यावर त्याने केसांना मसाज करा आणि रात्रभर केस तसेच ठेवा. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केसगळती होत असेल, तर मेथी दाण्यांच्या वापराने ती कमी होऊ शकते.

 

२. अळीव (garden cress, halim)अळीव काही तास पाण्यात भिजत ठेवा आणि रात्री दुधात टाकून ते प्या. किंवा खोबरं आणि तूप घालून अळीवाचे लाडू करा आणि ते नियमित खा. हा उपाय केसगळतीसाठी उपयुक्त ठरेल. अळीवात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असल्यास तो ही कमी होईल. 

 

३. जायफळ (Nutmeg)रात्री झोपताना दूध गरम करा आणि गरम दुधात चुटकीभर जायफळ पावडर टाका. जायफळामध्ये असणारे व्हिटॅमिन बी ६, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय साजूक तूप, हळद आणि दही हे पदार्थ नियमित खावेत, असेही त्यांनी सांगितले.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमानसून स्पेशल