Join us  

चाळिशीतही स्किनचा ग्लो कायम टिकवण्यासाठी आजच हे ३ पदार्थ खाणे टाळा, स्किन दिसेल ग्लोइंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 3:14 PM

3 Foods to Avoid If You Want Clear and Glowing Skin : चांगली, सुंदर, ग्लोइंग स्किन हवी असेल तर लाइफस्टाइल आणि खाणं - पिणं या दोघांमध्येही बदल करणे गरजेचे असते...

प्रत्येकालाच आपली स्किन ग्लोइंग असावी असे वाटत असते. आपल्या स्किनचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही उपाय करुन पाहतो. स्किन ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतो. परंतु या उपायांनी स्किन काही काळापुरतीच ग्लो करते, त्यानंतर आपली स्किन पुन्हा आहे तशीच दिसते. त्याचबरोबर वारंवार या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करून आपल्या त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य व ग्लो कायमचा बिघडू शकतो(Foods You Must Avoid To Get Glowing Skin).

जर आपल्याला स्किनवर कायमचा चमकणारा ग्लो हवा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. चांगली, सुंदर, ग्लोइंग स्किन (healthy skin) हवी असेल तर लाइफस्टाइल आणि खाणं-पिणं या दोघांमध्येही बदल करणे गरजेचे असते. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. स्किन ग्लोइंग करण्यासाठी फक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करून काही होत नाही. यासाठी तुमच्या रोजच्या खाण्या - पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. डाएटिशियन गौरी आनंद यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्किन कायम ग्लोइंग ठेवण्यासाठी  खाण्यापिण्यात नेमके कोणते बदल करावेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे(3 Foods to Avoid If You Want Clear and Glowing Skin).

ग्लोइंग स्किनसाठी या ३ पदार्थांपासून दूर राहा... 

१. तळलेले अन्नपदार्थ :- स्किनवर नैसर्गिक स्किन ग्लो टिकवण्यासाठी, आपण तळलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. तळलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी अतिशय चविष्ट व दिसायला आकर्षक, कुरकुरीत आणि चवदार असतात. परंतु या तळलेल्या पदार्थांच्या गोल्डन थराखाली ट्रान्स फॅट्स असतात ज्यामुळे  आपली स्किन खराब होऊ शकते. हे ट्रान्स फॅट्स आपल्या आरोग्यासाठी तसेच स्किनसाठी चांगले नसतात. यामुळे आपल्या त्वचेत अतिरिक्त तेल साचून राहते. त्यामुळे स्किन ग्लोइंगसाठी तळलेले अन्नपदार्थ खाणे बंद करावे. 

प्रियांका चोप्राला तिच्या आईने सांगितले होते खास ब्यूटी सिक्रेट, चाळीतशीही दिसते म्हणून कमाल सुंदर...

२. एअर टाईट कंटेनरमधील पदार्थ :- तळलेल्या अन्नपदार्थांसोबतच एअर टाईट कंटेनरमधील पदार्थ खाणे देखील टाळावे. हवाबंद डब्यांतील पदार्थ दिर्घकाळ टिकून राहावेत म्ह्णून त्यात भरपूर प्रमाणात साखर व मीठ घातलेले असते. यामुळे जर तुम्ही वारंवार अशा एअर टाईट कंटेनरमधील पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या स्किनवर दिसून येतो. यामुळे त्वचा जुनी दिसू लागते, त्याचबरोबर त्वचेवर एजिंगच्या खुणा, सुरकुत्या दिसू लागतात. यामुळे शक्यतो  एअर टाईट कंटेनरमधील पदार्थ खाणे बंद करा, यामुळे तुमचा स्किन ग्लो कायम टिकून राहील. 

३. साखर :- पांढरी साखर देखील आपल्या स्किनवरील ग्लो कमी करण्याचे एक मुख्य कारण असू शकते. अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने आपल्या त्वचेतील कॉलेजनचे नुकसान होऊन त्वचा अचानक काळपट व वृद्ध दिसू लागते.

डेड स्किनमुळे चेहरा डल दिसतो? हा घ्या डेड स्किन रिमुव्हल मास्क, पार्लरला जाण्याचीही गरज नाही...

या तीन गोष्टी तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या अजिबात खाऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीचं संतुलित प्रमाणात सेवन करणं योग्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी