Join us  

केस वाढतच नाहीत, खूप गळतात? केसांना द्या २ प्रकारचे व्यायाम, वाढतील भराभर- होतील दाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 2:58 PM

3 Hair Exercises For Long And Strong Hair: केस वाढत नसतील, त्यांची वाढ खुंटल्यासारखी झाली असेल तर हे २ प्रकारचे व्यायाम त्यांना द्या, केसांमध्ये काही दिवसांतच खूप चांगला बदल दिसून येईल. (home remedies for the fast hair growth)

ठळक मुद्दे हे व्यायाम जर तुम्ही केसांना नियमितपणे दिले तर त्यांचा केसांच्या वाढीवर नक्कीच खूप चांगला परिणाम दिसून येईल

बहुतांश लोकांना हल्ली केस गळण्याची समस्या जाणवते. तर काही जणांचे केस अजिबातच वाढत नाहीत, अशी त्यांची तक्रार असते. तुमच्याही केसांच्या बाबतीत या दोन तक्रारी असतील तर तुमच्या केसांना काही व्यायाम द्या (how to get rid of hair loss?). शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाला सुदृढ ठेवण्यासाठी जसे व्यायाम असतात, तसेच व्यायाम केसांच्या आरोग्यासाठीही असतात (3 hair exercises for long and strong hair). हे व्यायाम जर तुम्ही केसांना नियमितपणे दिले तर त्यांचा केसांच्या वाढीवर नक्कीच खूप चांगला परिणाम दिसून येईल (home remedies for the fast hair growth). ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करावेत ते पाहा..

 

केसांच्या वाढीसाठी व्यायाम

केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढ व्हावी, यासाठी कोणते व्यायाम करायला पाहिजेत, याविषयीची माहिती learnwith_mini_podcuts5 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

डोशाच्या पीठापासून करा ५ चवदार पदार्थ, एकदाच पीठ करा- वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या

१. बॅक कोम्बिंग

यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम आहे बॅक कोम्बिंग. बॅक कोम्बिंग म्हणजे खाली वाका आणि मागच्या बाजुने म्हणजेच मानेकडून कपाळापर्यंत उलट्या दिशेने ३ ते ४ मिनिटे केस विंचरा. यामुळे केस उलट दिशेला ओढले जातात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. बॅक कोम्बिंग करत असताना ते खूप जोरजोरात करू नये.

 

२. केस ओढणे

एका विशिष्ट पद्धतीने केस ओढले असता केसांच्या वाढीसाठी ते खूप चांगले ठरते. यासाठी तुमची बोटे केसांमध्ये घाला.

मुठभर हरबरे घेऊन अर्ध्या तासात घरीच तयार करा खमंग फुटाणे- विकतच्या फुटाण्यांची गरजच नाही

यानंतर केस पकडा आणि अगदी हळूवारपणे ते ओढा. केस ओढताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, एवढ्या हळूवारपणे ते ओढले गेले पाहिजेत. अन्यथा केस जास्त ताणले गेले तर ते तुटू शकतात.

 

३. व्यायाम

डोक्याच्या भागात जर उत्तमप्रकारे रक्तपुरवठा होत गेला तर त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. त्यामुळे सर्वांगासन, शिर्षासन असे डोके खालच्या बाजुला राहील अशा पद्धतीचे व्यायाम नियमितपणे करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीव्यायामहोम रेमेडी