Join us  

सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिणं टाळा, प्या ही ३ पेयं...ॲसिडिटीचा त्रास कमी- दिसाल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 4:33 PM

3 Healthy Drinks For Glowing Skin and Good Health : चेहरा कायम ग्लोईंग दिसावा यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय करता येऊ शकतात.

ठळक मुद्देत्वचेला कोणते इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो.चेहरा ग्लोईंग हवा तर बॉडी डिटॉक्स होणे गरजेचे असते, त्यासाठी ही पेयं अतिशय उपयुक्त ठरतात.

आपली त्वचा कायम ग्लोईंग आणि सतेज दिसावी यासाठी आपण काही ना काही करत असतो. कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट करतो तर कधी ब्रँडेड ब्यूटी प्रॉडक्टस वापरतो. मात्र आपली त्वचा सतेज असण्यामागे केवळ बाह्य उत्पादने नाही तर आपले आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते. आपले पोट स्वच्छ असेल तर चेहरा नितळ आणि तजेलदार दिसतो. नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, डाग पडणे अशा समस्या उद्भवतात. तसेच शरीरात योग्य त्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ जात असतील तर ठिक आहे नाहीतर त्वचा जास्त कोरडी पडते. अशा समस्या उद्भवू नयेत आणि चेहरा कायम ग्लोईंग दिसावा यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय करता येऊ शकतात. यासाठी सकाळी उठल्यावर काही पेयांचे नियमितपणे सेवन केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. 

सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी पिऊन ही पेय प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सकाळी उठल्यावर आपल्या पोटाचा पीएच थोडा अॅसिडीक असतो आणि मेटाबोलिझमही थोडा कमी असतो. रात्रभर आपण काही खाल्लेले नसल्याने सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात आधी जे खातो त्यातून शरीराला चांगले पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर काही हेल्दी पेय प्यायल्यास त्वचा आणि केस दोन्हासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. ही पेय आपण घरच्या घरी सहज तयार करु शकत असल्याने हे काम फारसे अवघडही नसते. पाहूयात ही पेय कोणती आणि ती कशी करायची..

(Image : Google)

१. हळदीचं दूध

हळदीचे दूध आरोग्यासाठी चांगले असते त्याचप्रमाणे त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. हळदीतील अँटीबॅक्टेरीयल गुण त्वचा स्वच्छ राहण्यासाठी उपयुक्त असतात. हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंटस असतात त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या येण्याचा वेग मंदावतो. तसेच त्वचा तजेलदार दिसण्यासाठीही हळदीचे दूध फायदेशीर असते. 

(Image : Google)

२. ग्रीन टी 

तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय असेल तर त्यामध्ये थोडा बदल करा. नेहमीचा चहा पिण्यापेक्षा सकाळी उठल्यावर ग्रीन टी घ्या. या चहामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स स्कीनमधील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. 

(Image : Google)

३. लिंबू-मध पाणी 

कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. टॉक्सिन्स बाहेर पडली तर चेहरा नितळ दिसण्यास मदत होते. आपल्या त्वचेला कोणते इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. मधामध्येही अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने त्वचेला इन्फेक्शनपासून वाचवण्याबरोबरच त्वचेतील तेलावर नियंत्रण करणे आणि त्वचा चमकदार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीलाइफस्टाइल