सध्या लोकांचे स्क्रीन टायमिंग (Screen Timing) वाढत चालले आहे. ज्यामुळे अपुरी झोप, दिसण्यात अडचण, स्ट्रेस वाढणे इत्यादी गोष्टी होतात. शिवाय डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circle) निर्माण होतात. डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वाढत्या वयाबरोबर, त्वचेतील कोलेजन कमी होऊ लागते, व हायड्रेशनचा अभाव असल्याने त्वचा आतून फुटू लागते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण महागडे क्रीम्स आणि जेलचा वापर करतो, पण यामुळे हवा तसा रिजल्ट मिळत नाही. अशा वेळी घरगुती नैसर्गिक उपायांनी देखील आपण डार्क सर्कल घालवू शकता. डार्क सर्कलमुळे चेहऱ्यावरील शोभा कमी होते, जर आपल्याला नैसर्गिकरित्या डार्क सर्कल (Beauty Tips) घालवायचं असेल तर, वेळीच ३ गोष्टींचा वापर करायला सुरुवात करा(3 Home Remedies for Dark Circles and How to Use Them).
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय (Home Remedies for Dark Circle)
एलोवेरा जेल
एलोवेरा जेलचा वापर केस, त्वचा यासह इतर कारणांसाठी होतो. एलोवेरा जेलमधील गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यासाठी एलोवेरा जेलचा वापर डार्क सर्कल घालवण्यासाठी करा. नियमित झोपण्यापूर्वी डोळ्याखाली एलोवेरा जेल लावून मसाज करा, व सकाळी पाण्याने चेहरा धुवा. यामुळे डोळ्यांखाली ब्लड सर्क्युलेशन वाढेल, शिवाय सुरकुत्याही कमी होतील.
केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट
व्हिटॅमिन ई ऑइल
डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करू शकता. व्हिटॅमिन ई ऑइल हे एक कोलेजन बूस्टर आहे. जे डोळ्यांखालील ब्लड सर्क्युलेशन बुस्ट करते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली व्हिटॅमिन ई तेल लावून मसाज करा. ज्यामुळे डोळ्यांखालील बारीक रेषा, सुरकुत्या कमी होतील.
आलिया भटसारखा ग्लो चेहऱ्यावर हवा, कच्चे दूध-गुलाबजल-खोबरेल तेल-कोरफडीचा १ उपाय- फक्त १ मिनिटांच
खोबरेल तेल
खोबरेल तेल लावल्याने डोळ्यांभोवती असलेले सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. हे तेल त्वचेला आतून मॉइश्चरायझ करतात, ज्यामुळे डार्क सर्कलही दूर होतात. यासाठी झोपण्यापूर्वी आपण डोळ्यांखाली खोबरेल तेल लावून मसाज करू शकता. सकाळी चेहरा पाण्याने धुवा. नियमित असे केल्याने नक्कीच लवकर फरक दिसेल.