Join us  

लांबसडक, काळ्याभोर केसांसाठी घरगुती उपाय.. 3 हेअर मास्क, लावा बिंधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 7:48 PM

3 सोप्या, घरगुती उपायांनी काळ्याभोर, लांबसडक सुंदर केसांची इच्छा पूर्ण होवू शकते. केसांच्या कोणत्याही समस्येवर उपयुक्त 3 प्रभावी हेअर मास्क.

ठळक मुद्देसाजूक तूप आणि बदामाच्या तेलाच्या हेअर मास्कमुळे केस वाढण्यास चालना मिळते. केसांच्या मुळांच्या पोषणासाठी दूध मधाचा हेअर मास्क उपयोगी ठरतो. केळ आणि ऑलिव्ह तेलाच्या हेअर मास्कमुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते. 

लांबसडक, काळेभोर केस  आपलेही असावेत असं वाटतं खूप. पण रोज हे स्वप्न आपल्या आवाक्यातलं वाटू नये अशी परिस्थिती केसांची असते. कोरडे केस, केसात गुंता, टाळुला सतत खाज , कोंडा, केस गळती .. एक ना अनेक समस्यांचा सामना अनेकींना करावा लागतो. ऋतुबदल, पोषणाचा अभाव, वातावरण, प्रदूषण, केसांवर रसायनांचा अति वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Image: Google

पार्लरमध्ये / क्लिनिकमध्ये जावून उपचार केल्यास त्याचा प्रभाव काही काळ टिकतो. पण समस्येचा मुळापासून इलाज करुन केस सुंदर करायचे असतील तर त्यासाठी पार्लर किंवा क्लिनिकमधल्या महागड्या उपचारांची गरज नाही असं तज्ज्ञ सांगतात. 3 सोप्या, घरगुती उपायांनी काळ्याभोर, लांबसडक सुंदर केसांची इच्छा पूर्ण होवू शकते.

Image: Google

1. तूप आणि बदाम तेल

एका भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार साजूक तूप आणि बदामाचं तेल समप्रमाणात घ्यावं. तूप आणि तेल चांगलं एकत्रं करुन घ्यावं. हे मिश्रण केसांच्या मुळांशी मसाज करत लावाव. संपूर्ण केसांना मसाज करावा. मसाज केल्यानंतर 2 तास ते केसांवर राहू द्यावं. नंतर केस सौम्य शाम्पूनं स्वच्छ धुवावेत. केसांना कंडिशनरही लावावं. साजूक तूप आणि बदामाच्या तेलाच्या हेअर मास्कमुळे केस वाढण्यास चालना मिळते.

Image: Google

2. दूध आणि मध

आपल्या केसांच्या लांबीनुसार एक् भांड्यात दूध आणि मध समप्रमाणात घ्यावं. दोन्ही चांगलं एकजीव करावं. हेअर ड्राय ब्रशचा वापर करत केसांना लावावं किंवा स्प्रे बाॅटलच्या सहाय्याने ते केसांवर स्प्रे करावं. केसांन हे मिश्रण लावल्यानंतर 15-20 मिनिटं ते केसांवर राहू द्यावं. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केसांच्या मुळांच्या पोषणासाठी दूध मधाचा हेअर मास्क उपयोगी ठरतो.

Image: Google

3. केळ आणि ऑलिव्ह ऑइल

केळ आणि ऑलिव्ह ऑइलचा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घ्यवं. त्यात एक पिकलेलं केळ कुस्करुन घालावं. दोन्ही गोष्टी एकजीव होईपर्यंत एकत्र कराव्यात. या मिश्रणाची एकजीव अशी प्युरी झाली की हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावावे. केसांवर ते 15-20 मिनिटं राहू द्यावे. केस धुताना आधी पाण्यानं केस धुवावेत आणि मग सौम्य शाम्पूचा वापर करत केस धुवावेत. या मास्कमुळे केसाचं चांगलं कंडिशनिंगही होतं. त्यामुळे शाम्पू लावल्यानंतर कंडिशनर लावण्याची गरज नसते. केळ आणि ऑलिव्ह तेलाच्या हेअर मास्कमुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी