Lokmat Sakhi >Beauty > केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

3 Kitchen Ingredient to Get Rid of Grey Hairs (Grey Hairs Solution) : ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन (Beauty Expert Shahnaz Hussain) यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 02:11 PM2024-01-14T14:11:45+5:302024-01-14T14:21:28+5:30

3 Kitchen Ingredient to Get Rid of Grey Hairs (Grey Hairs Solution) : ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन (Beauty Expert Shahnaz Hussain) यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

3 Kitchen Ingredient to Get Rid of Grey Hairs At Home by Beauty Expert Shahnaz Hussain | केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

वाढत्या वयात केस पांढरे होऊ लागतात. सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये वेळेआधीच लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. अनेकांचे केस वरून काळे तर आतून पांढरे दिसतात. (How to Get Black Hairs Naturally) केस पांढरे होण्याचं कारण अनुवांशिकही असू शकते.  ताण-तणाव, हॉर्मोनल, असंतुलन यामुळे केस तरूण वयातच पांढरे होऊ लागेल आहेत.(Hair Care Tips)

आजकाल मार्केटमध्ये हाय हेअर कलर भरपूर उपलब्ध आहेत. (Home Remedies Foe Grey Hairs) ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. कारण यात धोकादायक केमिकल्स असतात ते नकळत केसांचे नुकसान करतता.   ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन (Beauty Expert Shahnaz Hussain) यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायांचा वापर करून तुम्ही पांढरे केस कायमचे काळे करू शकता.

१) मेथीचे दाणे आणि हिना मेहेंदी

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या रिपोर्टनुसार फक्त पांढरे केसच नाही तर केसात कोंडा होण्याची समस्या टाळण्यासाठीही मेथीच्या बियांची (Ref) पावडर फायदेशीर ठरते. मेहेंदीच्या पॅकमध्ये तुम्ही  मेथीच्या बिया मिसळू शकता.  मेहेंदी पावडरमध्ये ४ चमचे लिंबाचा रस, 2 चमचेकॉफी, २ चमचे दही, एक चमचा मेथी पावडर, चहा पावडर आणि पाणी मिसळा. याची जाडसर पेस्ट तयार करून ती केसांना लावा. १ तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

नेहमी तेच तेच वाण कशाला? हळदी कुकूंवाला ५० रूपयांच्या आत द्या 'या' उपयोगी वस्तू; वाणाचे युनिक ऑपश्न

२) कढीपत्ता आणि नारळाचे तेल 

कढीपत्त्यात व्हिटामीन- बी असते. यामुळे मेलानिन रिस्टोर करण्यास मदत होते. ज्यामुळे केस पांढरे होत नाहीत. कढीपत्ता व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.  त्यात कोमट नारळाचं तेल घालून मिसळून घ्या. हा हेअर पॅक स्काल्प आणि केसांच्या लांबीला लावा. जवळपास एक तास थांबून नंतर केस धुवा. कढीपत्ता हा नैसर्गिक घटक केसांच्या वाढीसाठी आणि नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी गुणकारी ठरतो याबाबत अनेक  रिसर्च प्रकाशित झाले आहेत.

केस पिकलेत-डायची सवय नको? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय; केस होतील काळेभोर

३) बीटाचा हेअर डाय

जर तुमचे केस जास्त पांढरे झाले असतील तर तुम्ही कोणत्याही नॅच्युरल डायचा वापर करू शकता. बीटरूटपासून तयार  करण्यात आलेला हेअर डाय लावल्याने केस दीर्घकाळ चांगले राहतात. बीटरूट केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी उत्तम ठरतो. बीटाचा रस केसांना लावून ठेवा त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. तुम्हाला दिसेल केसांवर नॅचरल लूक आणि लाल रंग आला  आहे.

Web Title: 3 Kitchen Ingredient to Get Rid of Grey Hairs At Home by Beauty Expert Shahnaz Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.