पावसाळ्यात स्किनच्या संबंधित समस्या वाढतात. या दिवसात फंगल इन्फेक्शन, ऑइली स्किन, त्वचा चिपचिपित होणे, या समस्या छळतात. काही लोकं महागडे प्रॉडक्ट्स तर, काही घरगुती उपायांचा वापर करतात. पण केमिकल प्रॉडक्ट्समुळे आपली स्किन खराब होऊ शकते, त्यामुळे या प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळा. स्किन संबंधित समस्या सोडवण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू कोलेजन प्रोटीन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, ऑइली स्किंन, त्वचेवर इन्फेक्शन या समस्येपासून सुटका मिळू शकते(3 Lemon Based Face Packs For Glowing Skin).
लिंबू - साखर
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी, यासह ऑइली स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू व साखरेचा स्क्रब तयार करा. यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा साखर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून स्क्रब करा. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे ऑइली स्किन, व ब्लॅकहेड्स कमी होतील.
दोन गोष्टी शाम्पूत मिसळा आणि करा घरच्याघरी हेअरस्पा, केस चमकतील-पार्लरचा खर्चही वाचेल
लिंबू - मध
एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस घ्या, त्यात एक चमचा मध मिसळा. व ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटानंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. लिंबू आणि मधाच्या या मिश्रणामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील. व चेहऱ्याला नवी चमक मिळेल.
केस गळून विरळ झाले? रामदेव बाबा सांगतात 1 सोपा उपाय, केस होतील लांब घनदाट
लिंबू - तांदुळाचं पीठ
एका वाटीत तांदळाचं पीठ घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा, आवश्यक असल्यास आपण त्यात थोडे पाणी देखील मिक्स करू शकता. ही पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे मुरुमांचे डाग कमी होतील, यासह सैल पडलेली त्वचेलाही घट्टपणा येईल.