Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय

केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय

How To Control Hair Fall: केस गळणं कमी होत नसेल तर आता स्वयंपाक घरातील हे खास ३ पदार्थ वापरून करून बघा एक साेपा उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 05:03 PM2022-12-22T17:03:58+5:302022-12-22T17:05:00+5:30

How To Control Hair Fall: केस गळणं कमी होत नसेल तर आता स्वयंपाक घरातील हे खास ३ पदार्थ वापरून करून बघा एक साेपा उपाय..

3 Magical ingredients that helps to reduce hair fall, Home remedies and food for hair fall control | केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय

केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय

Highlightsचांगला परिणाम दिसून येण्यासाठी काही आठवडे नियमितपणे हा प्रयोग करणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर म्हणतात. 

केस गळण्यासाठी प्रदुषण, दुषित पाणी किंवा मग वेगवेगळ्या हेअर कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून केसांवर वारंवार होणारा केमिकल्सचा मारा या गोष्टी कारणीभूत ठरतात. तसेच आहारातून योग्य पोषण न मिळणे हे देखील कमकुवत केसांमागचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. त्यामुळे असे काही पदार्थ तुमच्या आहारात असायलाच पाहिजेत, जे केसांना मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतील आणि केसांचं गळणं कमी होईल..(3 Magical ingredients that helps to reduce hair fall) 

केस गळणं कमी करणारे ३ पदार्थ..
हे पदार्थ नेमके कोणते आणि ते कशा पद्धतीने खायला पाहिजेत या विषयी डॉ. खत्री यांनी vaidya_mihir_khatri या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एवढ्याशा लेकराला किती तो अभ्यासाचा धाक, रडत- रडत आईला म्हणतोय.... बघा व्हायरल व्हिडिओ 

केसांच्या वाढीसाठी हे पदार्थ अतिशय उपयुक्त असून त्यांचा जर नियमित वापर केला तर नक्कीच काही आठवड्यांमध्ये केस गळती कमी होईल, असं डॉक्टर सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी काळे तीळ, अक्रोड आणि आवळा हे ३ पदार्थ एका विशिष्ट पद्धतीने खाण्याचा सल्ला दिला आहे.

 

केस गळणं थांबविण्यासाठी उपाय..
१. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगत आहेत की काळे तीळ, अक्राेड आणि आवळा या तिघांची पावडर करून ठेवा.

२. आवळा पावडर विकत आणू शकता किंवा मग आवळे वाळवून घरीच त्याची पूड करू शकता.

६ कारणांमुळे हिवाळ्यात वारंवार होते सर्दी... फिट राहण्यासाठी बघा नेमकं काय करायचं

३. रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात या तिन्ही पदार्थांची पावडर एकेक चमचा अशा सम प्रमाणात टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि ते पाणी प्या.

४. चांगला परिणाम दिसून येण्यासाठी काही आठवडे नियमितपणे हा प्रयोग करणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर म्हणतात. 


 

Web Title: 3 Magical ingredients that helps to reduce hair fall, Home remedies and food for hair fall control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.