Join us  

केस गळण्याची ३ मुख्य कारणं आणि ३ सोपे उपाय- केस गळणं कायमचं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 9:14 AM

3 Major Reasons For Hair Fall: केस गळण्यामागची मुख्य कारणं कोणती आणि त्यावर काय उपाय करायचा ते पाहा.. केस गळणं कमी होऊन भराभर वाढतील. (How to stop hair loss?)

ठळक मुद्देनेमक्या कोणत्या गोष्टींमुळे केस गळतात आणि त्यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयीची ही खास माहिती एकदा बघा...

अगदी शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांचंच जीवन खूप धकाधकीचं, घाईचं झालं आहे. त्यामुळे या दिवसभराच्या कामाच्या दगदगीतून आपण सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण जेवणाकडे, पौष्टिक आहाराकडे मात्र तेवढं दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केसांसाठी पोषक ठरणारे अनेक पदार्थ आपल्या शरीराला मिळतच नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे मग केस गळण्याची समस्या खूप वाढते (How to stop hair loss?). काही जणांचे केस तर एवढे गळतात की अक्षरश: टक्कल पडतेय की काय अशी भीती वाटू लागते (3 Major reasons for hair fall). म्हणूनच नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे केस गळतात आणि त्यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयीची ही खास माहिती एकदा बघा...(3 simple ayurvedic remedies to control hair fall and boost hair growth)

 

केस गळण्याची कारणं कोणती आणि त्यावर काय उपाय करावा?

कोणकोणत्या गोष्टींमुळे केस गळतात आणि त्यावर कसे उपाय करायचे, याविषयीचा एक व्हिडिओ hirayogi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ टाका- झाडं पुन्हा होतील सदाबहार

यामध्ये असं सांगितलं आहे की तुमच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता असेल तर तुमचे केस हमखास गळणार. त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. प्रोटीन्सचे व्यवस्थित पचन व्हावे म्हणून व्यायामही करा.

दुसरे कारण म्हणजे जर शरीरात लोह, ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि झिंक कमी प्रमाणात असेल तर केस गळतात. त्यामुळे या घटकांचं आहारातलं प्रमाण वाढवा.

खूप जास्त स्ट्रेस घेणं हे देखील केस गळण्याचं एक कारण आहे.

 

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

१. केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा आणि पहिला उपाय म्हणजे दररोज एक कच्चा आवळा मीठ लावून खावा. आवळ्यामध्ये केसांसाठी पोषक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे या दिवसांत मिळतो आहे, तर रोज एक आवळा जरूर खा.

तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची मऊसूत बर्फी- सगळ्यांनाच आवडेल असा खास पदार्थ

२. दुसरा उपाय म्हणजे खाली वाकून करण्याची योगासनं करा. जेणेकरून डोक्याच्या दिशेने चांगला रक्तपुरवठा होऊन केस गळणं कमी होण्यास मदत होईल. उदा. शिर्षासन, अधोमुख श्वानासन, सर्वांगासन, सुर्यनमस्कार इ.

३. तिसरा उपाय म्हणजे खोबरेल तेल आणि कांद्याचा रस सम प्रमाणात घेऊन गरम करा. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि एखादा दिवस तसेच ठेवा. त्यानंतर या मिश्रणाने केसांना मसाज करा. केस गळणं कमी होऊन केसांची चांगली वाढ होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी