आपली त्वचा चमकदार आणि तुकतुकीत दिसावी, यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो (Skin Care Tips). मात्र, वाढत्या वयानुसार आणि चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे स्किनच्या निगडीत समस्या वाढत जातात. पुरळ, मुरुमांचे डाग, पिग्मेण्टेशन याकारणांमुळे चेहरा अधिक खराब दिसतो. यावर उपाय म्हणून आपण पार्लरमध्ये खूप पैसे खर्चही करतो. शिवाय वेळही वाया जातो.
आपण पाहिलंच असेल की, चेहऱ्यावर लहान पुरळ येतात, हे पुरळ काही केल्या लवकर जात नाही. बरं, हे पुरळ (Small Pimples) कशामुळे चेहऱ्यावर तयार होतात, हे ही आपल्याला कळून येत नाही. हे छोटे पिंपल्स घाण, घाम, फंगल, बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनमुळे होऊ शकतात. कधीकधी या पुरळांमुळे तीव्र खाज सुटते. जर आपल्यालाही या पिंपल्सचा त्रास होत असेल तर, यावर उपाय म्हणून घरगुती टिप्स फॉलो करून पाहा(3 Natural Ways to Get Rid of Pimples as Fast as Possible).
एलोवेरा जेल
त्वचेसाठी एलोवेरा जेल खूप फायदेशीर ठरते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी छोट्या पिंपल्सवर एलोवेरा जेल लावा. सकाळी पाण्याने चेहरा धुवा.
केस धुतले की घरभर केस गळून पडलेले दिसतात? शाम्पूत मिसळा १ गोष्ट, केस होतील शायनी - गळणे बंद
चंदन पावडर
चेहऱ्यावरील छोट्या दाण्यांपासून सुटका हवी असेल तर, आपण चंदन पावडरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा चंदन पावडर घ्या, त्यात गुलाब जल घालून मिक्स करा. तयार पेस्ट २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. चंदन पावडरच्या मदतीने चेहऱ्यावरील डेड स्किन निघेल. शिवाय लहान पिंपल्सपासूनही सुटका मिळेल.
मध
त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी मध उपयुक्त ठरते. मधातील गुणधर्म चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी जिथे लहान पुरळ असतील तिथे मध लावून मसाज करा. ३० मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे स्किन मुलायम होईल. शिवाय क्लिनही होईल. आपण याचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.