पोटाचा वाढता घेर ही अनेकांच्या पुढची अडचण आहे. एरवी बेढब पोटाकडे पाहून त्रास होतोच, पण फोटो (photo poses) काढताना मात्र जरा जास्तच वैताग येतो. कारण फोटाेमध्ये चेहरा आणि बॅकग्राऊंड खूप छान आलं तरीही सुटलेलं पोट नेमकं त्यात टिपल्या गेलं तर सगळ्याच फोटोचा विचका होऊन जातो. बरं श्वास आत रोखून धरणार तरी किती वेळ? आणि तसं केलं तरीही दिसायचं ते पाेट शेवटी दिसतंच. त्यामुळे मग स्वत:चे फोटो पाहण्याचा आणि काढण्याचाही सगळा मूडच निघून जातो.(How to hide the belly fat in photo)
तुमचीही समस्या अशीच असेल तर आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच म्हणून समजा. आता आपण अशा काही पोझेस बघणार आहोत, ज्यामुळे तुमचं सुटलेलं पोट तर व्यवस्थित झाकलं जाईलच पण तुम्ही आणखी स्टायलिश देखील दिसाल.
बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक
बऱ्याचदा पर्यटनस्थळी फिरायला गेल्यावर नेमकं कसं उभं राहून फोटो काढावा ते कळत नाही. त्यामुळे मग जवळपास सगळ्याच फोटाेंमध्ये एकसारखीच पोझ येते. म्हणूनच या काही पोझेज नक्कीच उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे फोटो आकर्षक येण्यास मदत होईल.
फोटोंमध्ये सुटलेलं पोट दिसू नये म्हणून...१. पहिल्या पोझमध्ये पोट झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सचा किंवा हॅण्डबॅगचा उपयोग करू शकता. यासाठी फोटोमध्ये तुमच्या शरीराची डावी किंवा उजवी फोकस होईल, अशा पद्धतीने उभे रहा. एक पाय पुढे आणि दुसरा पाय मागे, अशी साधारणपणे चालताना जशी पोझिशन असते तशी घ्या. फोटोमध्ये जो हात दिसणार आहे, त्या हातात पर्स पकडून ती तुमच्या पोटासमाेर पकडा.
२. बसून फोटो काढणार असाल, तर थोडंसं तिरकं बसा आणि पर्सच्या मदतीने, ओढणीने किंवा हाताने पोट झाकण्याचा प्रयत्न करा.
साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक
३. उभे राहून फोटो काढणार असाल तर दोन्ही पायांत अंतर घ्या आणि दोन्ही हातांनी पायाच्या मधोमध पर्स पकडा. यावेळी मान तिरकी करून कॅमेराकडे बघा.
याविषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
https://www.facebook.com/reel/187961597074310