Lokmat Sakhi >Beauty > केसांसाठी 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल वापरुन पहा, केसातील कोंड्यापासून केसगळतीपर्यंत अनेक समस्या होतील दूर!

केसांसाठी 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल वापरुन पहा, केसातील कोंड्यापासून केसगळतीपर्यंत अनेक समस्या होतील दूर!

3 Simple & Genius Ways To Use Aloe Vera For Hair : 3 Ways to Use Aloe Vera Gel for Hair : How to use aloe vera for hair : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल लावण्याच्या ३ मुख्य पद्धती कोणत्या ते पहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 08:23 PM2024-11-07T20:23:28+5:302024-11-07T20:36:44+5:30

3 Simple & Genius Ways To Use Aloe Vera For Hair : 3 Ways to Use Aloe Vera Gel for Hair : How to use aloe vera for hair : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल लावण्याच्या ३ मुख्य पद्धती कोणत्या ते पहा..

3 Simple & Genius Ways To Use Aloe Vera For Hair 3 Ways to Use Aloe Vera Gel for Hair How to use aloe vera for hair | केसांसाठी 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल वापरुन पहा, केसातील कोंड्यापासून केसगळतीपर्यंत अनेक समस्या होतील दूर!

केसांसाठी 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल वापरुन पहा, केसातील कोंड्यापासून केसगळतीपर्यंत अनेक समस्या होतील दूर!

कोरफड फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीचा गर हा सर्व प्रकारच्या केसांच्या समस्या दूर करण्यात उपयुक्त ठरतो. केसांची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे केसांसाठी आरोग्यदायी मानले जातात. कोरफडमध्ये असणारे मॉइश्चरायझिंग व संरक्षणात्मक गुणधर्म एकूण आरोग्यासाठी कमालीचे फायदेशीर ठरू शकतात(3 Ways to Use Aloe Vera Gel for Hair).

केसांना एलोवेरा जेल बरेचजण लावतात पण एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहित असते असं नाही. केसांना त्वचेप्रमाणेच एलोवेरा लावण्याचे बरेच फायदे आहेत. केस गळणं, त्वचेच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी एलोवेरा जेल (How to use aloe vera for hair) फायद्याचे ठरते. केसांना पोषण देण्यासोबतच एलोवेरा जेल केसांचे कंडीशनिंग करते. यासाठीच केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केसांना एलोवेरा जेल लावण्याच्या ३ मुख्य पद्धती कोणत्या ते पाहूयात(3 Simple & Genius Ways To Use Aloe Vera For Hair).

केसांसाठी एलोवेरा जेल लावण्याच्या मुख्य ३ पद्धती... 

१. एलोवेरा जेल मसाज :- एलोवेरा जेल केसांवर लावण्याच्या अनेक पद्धतींपैकी ही एक सर्वात सोपी पद्धत आहे. या पद्धतीत आपण एलोवेरा जेल बोटांच्या मदतीने केसांना व स्काल्पला लावून मसाज करु शकतो. एका वाटीत एलोवेरा जेल घ्या आणि बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांना आणि लांबीवर लावा. अर्ध्या तासांसाठी हे जेल तसेच केसांवर ठेवा. अर्ध्या तासाने केस शाम्पूने धुवा. कोरफडीचे जेल आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते. हे उत्कृष्ट कंडिशनिंग आणि स्मूथिंगचे कार्य करते. केसांना एलोवेरा जेल लावल्यानंतर ते धुण्यासाठी नेहमी सौम्य शॅम्पूचा वापर करावा. 

मस्कारा पसरुन पापण्यांवर जाड थर दिसतो? या ७ चुका टाळा, डोळे दिसतील टप्पोरे सुंदर...

२. एलोवेरा जेल स्प्रे :- केसांना एलोवेरा जेल लावण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे एलोवेरा जेल स्प्रे. जर तुम्हाला केसांवर एलोवेरा मास्क लावायला पुरेसा वेळ नसेल आणि आयत्यावेळी झटपट इन्स्टंट उपाय करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय वापरु शकता. एलोवेरा जेल स्प्रे बनवण्यासाठी पाण्यात फ्रेश एलोवेरा जेल घालून मिक्सरमध्ये एकत्रित बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावे. आपण हा एलोवेरा जेल स्प्रे केसांवर स्प्रे करु शकता. एलोवेरा जेल स्प्रे केसांवर फवारून ३० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. याचबरोबर आपण एलोवेरा जेल रात्रभर केसांवर देखील लावून ठेवू शकता. सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवून घ्यावेत.  

केसगळती थांबतच नाही? तुम्हीसुद्धा स्ट्रेस घेताय, डॉक्टर सांगतात स्ट्रेस आणि केसगळतीचा नेमका काय संबंध...

३. एलोवेरा जेल हेअर मास्क :- केसांवर आपण एलोवेरा जेल हेअर मास्क देखील लावू शकता. एलोवेरा जेल हेअर मास्क वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाऊ शकतात. एलोवेरा जेल आणि मध, एलोवेरा जेल आणि कॉफी मिक्स करून हेअर मास्क बनवू शकता. यासोबतच, एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल एकत्रित करुन केसांवर लावा. हे हेअर मास्क केसांना पूर्ण पोषण देतात आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

कोरड्या-काळ्यानिळ्या पडलेल्या नखांवर चमकच नाही? ‘हे’ ५ उपाय करा- नखं दिसतील गुलाबी सुंदर...

Web Title: 3 Simple & Genius Ways To Use Aloe Vera For Hair 3 Ways to Use Aloe Vera Gel for Hair How to use aloe vera for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.