Lokmat Sakhi >Beauty > फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला

फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला

3 Simple Hair Care Tips For Long And Strong Hair: केसांच्या बाबतीत वेगवेगळ्या तक्रारी असतील तर हे काही सोपे आयुर्वेदिक उपाय नियमितपणे करा..(ayurvedic solution for hair related problems)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2024 02:07 PM2024-12-05T14:07:06+5:302024-12-05T14:38:47+5:30

3 Simple Hair Care Tips For Long And Strong Hair: केसांच्या बाबतीत वेगवेगळ्या तक्रारी असतील तर हे काही सोपे आयुर्वेदिक उपाय नियमितपणे करा..(ayurvedic solution for hair related problems)

3 simple hair care tips for long and strong hair, ayurvedic solution for hair related problems | फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला

फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला

Highlightsमेथ्या, दही, कोरफड आणि आवळा हे पदार्थ वापरून हेअरमास्क तयार करा. ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांना छान चमक येईल.

आपले केस दाट असावेत, त्यांची चांगली वाढ व्हावी, ते गळू नयेत (hair loss), अकाली पांढरे होऊ नयेत (gray hair), केसांमध्ये काेंडा नसावा (dandruff) असं जवळपास प्रत्येकालाच वाटतं. पण आता मात्र अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाचीच केसांच्या बाबतीत कोणती ना कोणती तक्रार आहे. कोणाचे केस कमी वयात पिकायला लागले आहेत तर कोणाचे केस गळून गळून टक्कल पडण्याची वेळ आली आहे. कोणाच्या केसांना अजिबातच वाढ नाही तर कोणी डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण आहेत. तुमच्याही अशाच काही समस्या असतील तर फक्त ३ सोपे उपाय करा (3 Simple Hair Care Tips For Long And Strong Hair). यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्याच समस्या हळूहळू कमी होतील आणि केसांच्या बाबतीत कधीच कोणती तक्रार राहणार नाही, असं आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत.(ayurvedic solution for hair related problems)

 

केसांच्या तक्रारी कमी करण्यासाठी ३ आयुर्वेदिक उपाय

केसांच्या जवळपास सगळ्याच समस्या कमी करण्यासाठी नियमितपणे कोणते उपाय केले पाहिजेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

'हा' पदार्थ घ्या आणि दिवसातून एकदा चेहऱ्याला लावा! ७ दिवसांत दिसेल लक्षणीय बदल- त्वचा चमकेल

१. डोक्याला मालिश करणे

डोक्याच्या त्वचेखाली व्यवस्थित रक्ताभिसरण होऊन केसांची मुळं पक्की होण्यासाठी हा उपाय करणं अतिशय आवश्यक आहे. आठवड्यातून दोन वेळा तुमच्या डोक्याला हलक्या हाताने नक्की मसाज करा. मसाज करताना केस खूप जोरजाेरात ओढले जातील, अशा पद्धतीने चोळू नका.

 

२. हेअर मास्क

आपण चेहऱ्याला ज्याप्रकारे स्किन केअर मास्क लावतो, तशीच गरज आपल्या केसांनाही असते. त्यामुळे केसांना आठवड्यातून दोन वेळा जरूर हेअरमास्क लावा.

या हिवाळ्यात अभिनेत्री भाग्यश्रीच्या रेसिपीने डिंकाचे लाडू करून पाहा - बघा एकदम खास रेसिपी 

त्यासाठी आपल्याला कोणताही विकतचा हेअरमास्क आणण्याची गरज नाही. मेथ्या, दही, कोरफड आणि आवळा हे पदार्थ वापरून हेअरमास्क तयार करा. ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांना छान चमक येईल.

 

३. बायोटीनयुक्त आहार

वरील दोन उपायांसोबतच तुम्हाला केसांच्या आरोग्यासाठी गरजेचे असणारे काही पदार्थ नियमितपणे खाणंही गरजेचं आहे.

तुम्ही पाण्याची बाटली नाही आजारपण विकत घेताय! FSSAI चा अहवाल, हाय रिस्क इशारा, सावधान..

तीळ, मोड आलेल्या मेथ्या आणि बदाम या पदार्थांमधून केसांना भरपूर प्रमाणात बायोटीन मिळतं. त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत हाेते. त्यामुळे हे पदार्थ तुमच्या आहारात आवर्जून असायलाच हवेत. 


 

Web Title: 3 simple hair care tips for long and strong hair, ayurvedic solution for hair related problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.