Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात इन्स्टंट ग्लो हवाय? स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टींचा वापर करा; चेहरा चमकेल

पावसाळ्यात इन्स्टंट ग्लो हवाय? स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टींचा वापर करा; चेहरा चमकेल

3 Simple Home Remedies for Glowing Skin : इन्फेक्शन, मुरुमांचे डाग होतील कायमचे गायब; फक्त ३ गोष्टींचा 'या' पद्धतीने वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 08:22 PM2024-07-19T20:22:59+5:302024-07-19T20:22:59+5:30

3 Simple Home Remedies for Glowing Skin : इन्फेक्शन, मुरुमांचे डाग होतील कायमचे गायब; फक्त ३ गोष्टींचा 'या' पद्धतीने वापर करा

3 Simple Home Remedies for Glowing Skin | पावसाळ्यात इन्स्टंट ग्लो हवाय? स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टींचा वापर करा; चेहरा चमकेल

पावसाळ्यात इन्स्टंट ग्लो हवाय? स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टींचा वापर करा; चेहरा चमकेल

त्वचेची चमक वाढवण्यासाठी लोक पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसे खर्च करतात (Skin care tips). ट्रिटमेण्ट आणि सौंदर्य उत्पादनांवर पैसे खर्च हा होतोच. पण याचा फायदा त्वचेसाठी कितपत होऊ शकतो? हे आपल्याला ठाऊक आहे का? बऱ्याचदा सौंदर्य उत्पादनांमुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते (Beauty). किंवा त्वचेच्या निगडीत समस्या वाढू शकतात.

जर आपल्याला पैसे खर्च न करता, शिवाय केमिकल उत्पादनांचा वापर न करता, त्वचा क्लिन ठेवायची असेल तर, किचनमधल्या ३ गोष्टींचा वापर करून पाहा. या नैसर्गिक गोष्टींमुळे त्वचेवर तेज येईल. शिवाय त्वचेच्या संबंधित समस्याही दूर राहतील. पण कोणत्या घरगुती गोष्टींचा वापर करावा? पाहूयात(3 Simple Home Remedies for Glowing Skin ).

दही

दही हे त्वचेसाठी वरदान आहे. दही फक्त आरोग्यासाठी नसून, त्वचेच्या अनेक समस्या सोडवते. जर आपली ड्राय स्किन असेल तर, आपण दह्याचा वापर करू शकता. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो. यासाठी चेहऱ्यावर १० मिनिटे दही लावा. १० मिनिटानंतर चेहरा धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

मध

स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मध त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. मध नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. जर नितळ त्वचा हवी असेल तर, आपण फेसपॅकमध्ये किंवा मास्कमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे मधाप्रमाणे चेहऱ्यावर सोनेरी तेज दिसेल.

केस इतके पांढरे की वयस्कर दिसू लागलात? चमचाभर हळदीचा 'करा' स्पेशल डाय; केस होतील काळेभोर

लिंबू

आरोग्यासाठी गुणकारी मानला जाणारा लिंबू, त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू कॉलेजन प्रोटीन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, इन्फेक्शन आणि अनेक समस्याही दूर होतात. आपण लिंबू - साखर किंवा लिंबू मधाचा देखील वापर करू शकता.

Web Title: 3 Simple Home Remedies for Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.