Join us  

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 8:41 PM

Tulsi Benefits: Apply These 3 Easy Hair Mask For Smooth and Black Hair : लांब-दाट-काळ्याभोर केसांसाठी अस्सल घरचा उपाय.. तुळशीच्या हेअर मास्कनं केसांचं सौंदर्य वाढतं, समस्या होतात दूर !

तुळशीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे. तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते. फार पूर्वीपासून तुळशीचा अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापर करण्यात आला आहे. तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे देखील मिळतात. विशेष म्हणजे केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळस अत्यंत फायदेशीर ठरते. केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. केसांंमधील कोंडा, केस कोरडे आणि निस्तेज होणे, केसांना फाटे फुटणे अशी त्यामागची अनेक कारणे असू शकतात. यासाठी  केसांचे योग्य पोषण होणे फार गरजेचे असते. केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि केस लांबसडक, घनदाट करण्यासाठी आपण केसांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तुळशीचा वापर करु शकतो. 

तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे केसांच्या विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. तुळशीचा विविध स्वरुपात (Tulsi Hair Mask for Long Thick Healthy Hair) वापर करुन केसांचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. केसांच्या विविध समस्यांवर वेगवेळ्या प्रकारचे तुळशीचे हेअर मास्क(How to Use Tulsi For Hair) वापरुन केसांच्या सौंदर्यात अधिक भर पाडता येऊ शकते(3 Simple Tulsi Hair Pack Recipes to Get Strong Hair).

केसांसाठी तुळशीचा वापर नेमका कसा करावा ? 

१. तुळस आणि आवळा :- केसगळती थांबवण्यापासून ते केसांची वाढ होऊन केस घनदाट, लांबसडक करण्यापर्यंत आपण तुळशीचा वापर करु शकतो. सर्वप्रथम तुळशीची पाने उन्हांत वाळवून त्याची बारीक पावडर बनवा. जर पावडर नसेल तर तुळशीच्या पानांची मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून आवळा पावडर घालूंन त्यांची पेस्ट तयार करून घ्यावी. या मिश्रणात आता खोबरेल तेल घालूंन हा हेअर मास्क हलकेच गरम करून घ्यावा. नंतर या तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करावा. यामुळे केसगळतीची समस्या कायम दूर होण्यास मदत मिळते. 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

२. तुळस आणि नारळाचे दूध :- तुळशीची पाने आणि नारळाचे दूध यांचा वापर करून आपण केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणू शकतो. तुळशीच्या पानांची पावडर आणि नारळाचे दूध समप्रमाणात घेऊन ते एकजीव करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट केसांच्या मुळांना व संपूर्ण केसांना लावून घ्यावी. त्यानंतर ही पेस्ट केसांवर २० ते २५ मिनिटे तशीच ठेवून द्यावी व नंतर केस स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावे. 

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

३. तुळस आणि लिंबाचा रस :- तुळस आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा हेअर मास्क केसांना लावल्यावर केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. तुळस आणि लिंबाचा रस केसांना लावल्याने केसांसोबतच, स्कॅल्पचे आरोग्य चांगले राखले जाते. यासाठी वाटीभर तुळशीच्या पानांचा रस काढून घ्या. या रसात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा रस केसांच्या मुळांना लावा आणि २० ते ३० मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यामुळे आपल्या  केसांचे आरोग्य नक्कीच चांगले होऊ शकते.

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस..

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स