Join us  

दिवसरात्र गळून केस विरळ झाले? जास्वंदाच्या फुलाचा जादूई उपाय, विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 3:39 PM

3 Simple ways to use hibiscus for healthy hair (Jaswand kesana kasa lavaycha) : घरच्याघरी फक्त १० ते २० रूपये खर्च करून  तुम्ही केस वाढवू शकता.

आपले केस दाट,लांबसडक असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (Hair Growth Solution) पण बदलत्या वातावरणात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे सध्या केस डॅमेज होत जातात आणि केसांना गळती लागते. (Jaswand kesana fayde in marathi)केसांच्या चांगल्या वाढीसाठी बाजारातून तेल, शॅम्पू विकत आणूनही फारसा उपयोग होत नाही. केमिकल्सयुक्त उत्पानदनांच्या वापराने केस जास्तच गळू लागतात. घरच्याघरी फक्त १० ते २० रूपये खर्च करून  तुम्ही केस वाढवू शकता. (Hair Care Tips)

केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सचा वापर न करता तुम्हाला केस सुंदर बनवायचे असतील तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How to stop Hair fall) ज्यामुळे कोणतंही नुकसान  होता केस लांबसडक आणि दाट होतील. अनेक हेअर केअर उत्पादनांमध्ये फुलांचा वापर केला जातो. (Home Remedies for Hair Growth and Thickness)

फुलांचा वापर केसांवर कोणत्या पद्धतीने करता येतो ते पाहूया. केसांवर तुम्ही कडुलिंबाची पानं, तुळशीची पानं, जास्वंदाच्या पानांचा उपयोग करू शकता. जास्वंदाच्या फुलांचा वापर करून केसांना सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स आहेत. ज्यामुळे केस लांबसडक आण दाट-मजबूत होतील.(How to use hibiscus for long and thick hairs)

समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस

केसांसाठी जास्वंदाचे फूल रामबाण मानले जाते. याच्या वापराने केस गळती कमी होते. इतकंच नाही तर जास्वदाच्या फुलाच्या वापराने केस दाट,काळे होतात. या पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. केसांना तुम्ही हेअर पॅक, हेअर सिरम किंवा कंडिशनर  बनवूनही लावू शकता. 

जास्वंदाच्या फुलाचा हेअर मास्क (Hibiscus Hair Mask)

केसांना तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा हेअर मास्कही लावू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी २ ते ४  जास्वंदाची फुलं आणि त्याची पानं सुद्धा घेऊ शकतात. समान प्रमाणात जास्वंदाचे फुल आणि जास्वंदाची पानं घेऊन बारीक वाटून घ्या.  हे मिश्रण १ तासासाठी केसांवर लावून ठेवा नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केस सॉफ्ट आणि शायनी  होतील.

जास्वंदाचे तेल (Hibiscus  Hair Oil)

केसांवर तुम्ही जास्वंदाचे तेलही वापरू शकता. यासाठी नारळाच्या तेलात जास्वंदाची पानं आणि फुलांसह आवळा मिसळा. त्यानंतर तेल गरम करून घ्या. मग तेल थंड होण्यासाठी ठेवा. नंतर गाळून तेल एका बॉटलमध्ये भरा. आठवड्यात ३ वेळा हे तेल केसांना लावा आणि २ तासांनी केस धुवून घ्या. 

टॅग्स :फिटनेस टिप्सब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स