Lokmat Sakhi >Beauty > स्किनच्या समस्या आता विसरा, चमचाभर साखरेचा करून पाहा ३ स्क्रब, त्वचा दिसेल सॉफ्ट - कोमल

स्किनच्या समस्या आता विसरा, चमचाभर साखरेचा करून पाहा ३ स्क्रब, त्वचा दिसेल सॉफ्ट - कोमल

3 sugar scrubs you can make at home to exfoliate your skin साखरेचा करून पाहा ३ फेसस्क्रब, डेड स्किन निघेल, त्वचा होईल सॉफ्ट - कोमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 01:21 PM2023-06-11T13:21:50+5:302023-06-11T13:22:36+5:30

3 sugar scrubs you can make at home to exfoliate your skin साखरेचा करून पाहा ३ फेसस्क्रब, डेड स्किन निघेल, त्वचा होईल सॉफ्ट - कोमल

3 sugar scrubs you can make at home to exfoliate your skin | स्किनच्या समस्या आता विसरा, चमचाभर साखरेचा करून पाहा ३ स्क्रब, त्वचा दिसेल सॉफ्ट - कोमल

स्किनच्या समस्या आता विसरा, चमचाभर साखरेचा करून पाहा ३ स्क्रब, त्वचा दिसेल सॉफ्ट - कोमल

पदार्थातील गोडवा वाढवण्यासाठी आपण साखरेचा वापर करतो. पण त्या व्यतिरिक्त साखरेचा वापर होतो का? चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण साखरेचा वापर करू शकतो. साखरेचा स्क्रब त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात टॅनिंग, मुरुमांचे काळे डाग, डेड स्किन या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, आपण साखरेच्या स्क्रबचा वापर करू शकतो.

मुख्य म्हणजे या स्क्रबमुळे डेड स्किन निघून जाते. डेड स्किन काढल्यामुळे क्रीम किंवा लोशनचा प्रभावही अनेक पटींनी वाढतो. ज्यामुळे स्किनला नैसर्गिक चमक मिळते, व त्वचा तुकतुकीत दिसते. त्यामुळे साखरेत या तीन गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा. चेहरा ग्लो करेल(3 sugar scrubs you can make at home to exfoliate your skin).

ओट्स आणि साखर

ऑईली स्किनमुळे त्रस्त असाल तर, ओट्स आणि साखरेचा फेसमास्क लावा. यासाठी एका वाटीत ओट्स घ्या त्यात २ चमचे साखर मिक्स करा. आता त्यात मध आणि गुलाब जल मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळेसाठी हाताने स्क्रब करा. स्क्रबिंग केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

फक्त १ चमचाभर मेथी दाणे घ्या, जाड घट्ट लांब केसांसाठी ३ सोपे उपाय

बदाम तेल आणि साखर

बदाम तेल आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या तेलामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील मुरुमे आणि पिंपल्स दूर करतात. यासाठी एका वाटीत बदाम तेल आणि साखर घेऊन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. व काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

केस किती दिवसांनी कापावे? खरेच कापले की केस वाढतात का? जावेद हबीब सांगतात...

हळद आणि साखर

हळदीचा वापर चेहऱ्यासाठी गुणकारी ठरतो. एका वाटीत हळद, साखर आणि गुलाबजल घेऊन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. व काही वेळेसाठी स्क्रब करा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. या उपायामुळे टॅनिंगसह इतरही समस्या कमी होतील.

Web Title: 3 sugar scrubs you can make at home to exfoliate your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.